Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची निर्मिती, विदर्भातून जगभर निर्यातीच्या संधी

October 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदर्भासाठी व्यावसायिक विकासाचे एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.

 

नागपूर शहर हे झिरो माईलचे ठिकाण असून देशाच्या हृदयस्थानी आहे. त्यामुळे या शहराला लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता आहे. वर्ध्याच्या ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे त्यादिशेने वाटचाल सुरु झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये वर्ध्याच्या सिंधी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट मध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्‍याचे पशुसंवर्धन मंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, वर्धाचे खासदार रामदास तडस, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी, नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड चेसंचालक के. सतिनाथन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभागाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

nitin gadkari

ड्राय पोर्ट येथून जगभरात निर्यातीच्या संधी

  • या मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून वर्धाच्या सिंधी (रेल्वे) ड्राय पोर्ट येथून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
    येत्या 5 वर्षांमध्ये 50 हजार जणांना रोजगार संधी या पार्कद्वारे उपलब्ध होतील.
  • या प्रकल्पाकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एन.एच.एल.एम.एल.) या स्पेशल पर्पज व्हेईकल- एस. पी. व्ही. ची स्थापना केली आहे.
  • या एस. पी. व्ही. सोबत जेएनपीटी काम सुरू करणार आहे.
  • आपल्या देशात निर्यातीसाठीचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सहाय्यक ठरतील.
  • सदर मल्टी मॉडेल पार्कला रेल्वे तसेच समृद्धी तसेच नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जोडले जाईल.
  • या पार्कमध्ये मध्ये शीतगृह कंटेनरची व्यवस्था असल्याने फळ-पिकाची नासाडी होणार नाही.
  • शेतकऱ्यांचा शेतमाल तसेच इतर वस्तू कमी वाहतूक खर्चात निर्यात करता येतील.

 

या निर्यात सुविधेचा फायदा घेण्यासाठी विदर्भातील उद्योग व्यापार संघटना, लघु उद्योग भारती,विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन या विषयावर परिसंवाद घ्यावा अशी सूचना सुद्धा गडकरी यांनी केली. या ड्रायपोर्टच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने औद्योगिक क्षेत्र स्थापन करावे. महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ- म्हाडा, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ- सीकॉम यांच्या माध्यमातून सिंदी शहराला स्मार्ट शहर बनवून येथील स्थानिक युवकांना या मल्टी मॉडेल पार्कमध्ये रोजगार मिळावा असे प्रयोजन करावे अशी सूचना सुद्धा गडकरी यांनी केली.

 

पूर्व विदर्भातील खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला सुद्धा या ड्रायपोर्टच्या माध्यमातून चांगल्या निर्यातीच्या संधी उपलब्ध होतील. या संदर्भात महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आणि मत्स्य विभागाने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. मिहान येथे कमी वजनाच्या मालाच्या वाहतूकीसाठी कार्गोची सुविधा असून सिंधी रेल्वे येथे जड मालाच्या कार्गोहबची सुविधा उपलब्ध झाली आहे यामुळे बांगलादेश सारख्या देशामध्ये सुद्धा संत्रा वाहतूक वर्ध्याच्या ड्राय पोर्टमधून आता होणार आहे यामुळे विदर्भातील वरुड, मोर्शी, काटोल यासारख्या संत्रा उत्पादक जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना फायदा होईल. संत्र्यांची पॅकेजिंग तसेच गुणवत्ता संदर्भात या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

याप्रसंगी उपस्थित राज्‍याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या पुढाकाराने हे जनकल्याणाचे काम सुरू आहे, या प्रकल्पाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण त्या मंजुरी देऊ असे आश्वासन दिले. वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी सिंदी येथील ड्रायपोर्ट मुळे वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा येथे स्थानिक शेतकऱ्यांना होईल असं सांगितलं .जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांनी याप्रसंगी रेल्वे सोबत राष्ट्रीय महामार्गची जोडणी या प्रकल्पाला झाली आहे. आतापर्यंत एर्ध्याच्या ड्रायपोर्टच्या बांधकामामध्ये जेएनपीटी द्वारे 127 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती दिली. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड संचालक के सत्यनाथन यांनी या मल्टी मॉडेल पार्कचा आयात निर्यातीसोबतच देशांतर्गत उत्पादनाला सुद्धा याचा मोठा लाभ होईल असं सांगितलं.

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुमन प्रसाद सिंग यांनी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत वाहतूक खर्च कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितलं. देशातील एकूण 35 मल्टी मॉडल पार्क पैकी आसाममधील पार्कचे बांधकाम चालू झाले असून चेन्नई नंतर आता नागपुरात या पार्कची स्थापना होत असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ध्यातील लॉजिस्टीक पार्क हा सिंदी (रेल्वे )येथे प्रस्तावित असून त्याचे क्षेत्रफळ 345 एकर असून हा पार्क नागपूर- मुंबई रेल्वेमार्गावर असणाऱ्या सिंदी रेल्वे स्टेशनपासून 1.2 किमी च्या अंतरावर आहे. याप्रसंगी वर्धा व नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, विविध उद्योग संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Tags: boost exportmodel logistic parkmuktpeethNitin GadkariSindhi Dry Portvidarbhaड्राय पोर्टनितीन गडकरीमल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुक्तपीठवर्धा सिंदी
Previous Post

आता भारतीय विमानं आणि जहाजांमध्येही इंटरनेट आणि कॉल सुविधा!

Next Post

स्टोरीटेलचा बंपर धमाका! हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद केवळ ३९९ रु. मध्ये वर्षभर!

Next Post
storytell

स्टोरीटेलचा बंपर धमाका! हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद केवळ ३९९ रु. मध्ये वर्षभर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!