मुक्तपीठ टीम
स्मार्टफोनमुळे जगात सर्व सोपे आणि सहज तर झालेच आहे परंतु, त्यात धोकाही तितकाच वाढला आहे. सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारासाठी स्मार्टफोन उपयुक्त ठरतो. पण, स्मार्टफोनमध्ये एखाद्या वेळेस व्हायरस किंवा मालवेअर आला तर धोका अधिकच वाढतो. अशाच एका घातक मालवेअरची माहिती समोर येत आहे. या मालवेअरचे नाव DRINIK आहे.
DRINIK मालवेअर कसे कार्य करते?
- मोबाईल बँकिंग सेवेचा वापर करत असाल तर या व्हायरसबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
- हा व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतो आणि अनेक अॅप्सवर ताबा मिळवतो.
- हा व्हायरस आपोआप ताबा मिळवून थेट कॉल, एसएमएस करण्यास सक्षम होतो.
- हा व्हायरस स्मार्टफोनचा स्टोरेज अॅक्सेस देखील घेतो.
DRINIK मालवेअर डेटाही चोरतो
- स्मार्टफोनमधील डेटा चोरण्यासाठी हा व्हायरस सर्वप्रथम स्मार्टफोनचा अॅक्सेस घेतो.
- प्रवेश मिळाल्यानंतर, ते स्क्रीनवर होत असलेल्या सर्व अॅक्टीव्हिटीची नोंद घेते.
- जेव्हा स्मार्टफोनमध्ये मोबाईल बॅंकिग करताना पिन टाकतो तेव्हा आवश्यक माहिती भरल्यावर ते सर्व माहिती रेकॉर्ड करते आणि ती सेव्ह करते.
- हा व्हायरस इतका सक्षम आहे की तो बायोमेट्रिक्सही चोरू शकतो.
- हे सर्व चोरीचे तपशील नंतर सर्व्हरला पाठवले जातात.
DRINIK मालवेअर कसे टाळावे?
- जर ड्रिनिक व्हायरसपासून स्वतःला वाचवायचे असेल तर, सर्वप्रथम, एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
- स्मार्टफोनमध्ये कोणतेही अॅप फिचर किंवा स्टोरेज ऍक्सेस देऊ नका.
- परताव्यासाठी सरकार जनतेला कधीही एसएमएस पाठवत नाही. त्यामुळे सरकारच्या नावाने कोणताही एसएमएस आला की लगेच त्यावर विश्वास ठेवू नका.
- बँकिंगशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी स्मार्टफोनऐवजी कॉम्प्युटरचा वापर करा.