Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मंगळवारी ठाणे दणाणणार! राजगर्जनेसाठी मनसेचा टिझर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Manse Uttarsabha

मुक्तपीठ टीम

गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडलेला मनसेचा पाडवा मेळावा अजूनही चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे मनसेच्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांचे शहराध्यक्ष पद काढून घेतले. आघाडी सरकारच्या नेत्यांनी टीका ही केली. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्या ठाकरीबाण्यात १२ एप्रिल रोजी सभा घेणार आहेत. ही सभा ठाण्यात होणार असून या सभेला उत्तरसभा असे म्हटले जात आहे. याचा एक टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

 

सभा तर होणारच!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ढोंग उघडकीस आणून त्यांना सणसणीत आणि खणखणीत ‘उत्तर’ देण्यासाठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची ‘उत्तर’सभा!
ठाण्यात, दि. १२ एप्रिल रोजी.#RajThackeray #राजसाहेब_ठाकरे #उत्तरसभा #MNSAdhikrut pic.twitter.com/FetCwEaQlF

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 9, 2022

 

मनसेच्या ठाण्यातील उत्तरसभेचा टीझर प्रदर्शित…

  • ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.
  • गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे.
  • मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
  • देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत.
  • या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.
  • राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा pic.twitter.com/KwXm9mbsKM

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2022

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाडवा मेळावा पार पडला.
  • यावेळी बोलताना त्यांनी मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला.
  • मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील.
  • मी धर्मांध नसून धर्माभिमानी आहे.
  • जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.
  • त्यांच्या या वक्तव्यावरून मनसेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले.
  • मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं तर पुण्याचे वसंत मोरे यांचे शहाराध्यक्ष पद काढून घेतले.

Tags: manseRaj ThackeraySandeep Deshpandethaneठाणेमनसेमनसे उत्तरसभाराज ठाकरेसंदीप देशपांडे
Previous Post

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांना प्रशिक्षित करून रोजगाराची संधी

Next Post

महाराष्ट्र केसरी पहिलं पाऊल, पृथ्वीराज पाटलांचं लक्ष्य ग्लोबल!

Next Post
Prithviraj Babasaheb Patil won the final match of Maharashtra Kesari.

महाराष्ट्र केसरी पहिलं पाऊल, पृथ्वीराज पाटलांचं लक्ष्य ग्लोबल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!