मुक्तपीठ टीम
गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडलेला मनसेचा पाडवा मेळावा अजूनही चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे मनसेच्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांचे शहराध्यक्ष पद काढून घेतले. आघाडी सरकारच्या नेत्यांनी टीका ही केली. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज ठाकरे आपल्या ठाकरीबाण्यात १२ एप्रिल रोजी सभा घेणार आहेत. ही सभा ठाण्यात होणार असून या सभेला उत्तरसभा असे म्हटले जात आहे. याचा एक टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सभा तर होणारच!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ढोंग उघडकीस आणून त्यांना सणसणीत आणि खणखणीत ‘उत्तर’ देण्यासाठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची ‘उत्तर’सभा!
ठाण्यात, दि. १२ एप्रिल रोजी.#RajThackeray #राजसाहेब_ठाकरे #उत्तरसभा #MNSAdhikrut pic.twitter.com/FetCwEaQlF— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 9, 2022
मनसेच्या ठाण्यातील उत्तरसभेचा टीझर प्रदर्शित…
- ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.
- गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे.
- मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
- देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत.
- या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.
- राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा pic.twitter.com/KwXm9mbsKM
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2022
काय म्हणाले होते राज ठाकरे?
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाडवा मेळावा पार पडला.
- यावेळी बोलताना त्यांनी मशिदींवरील भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला.
- मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील.
- मी धर्मांध नसून धर्माभिमानी आहे.
- जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.
- त्यांच्या या वक्तव्यावरून मनसेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले.
- मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं तर पुण्याचे वसंत मोरे यांचे शहाराध्यक्ष पद काढून घेतले.