Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी ‘मनसे’ प्रयत्न, राज ठाकरे दौऱ्यावर येणार!

February 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mns raj thackeray will focus on pune for municipal election

मुक्तपीठ टीम / पुणे

मुंबई आणि नाशिकनंतर पुणे म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेचा प्रभाव असणारा भाग. त्यातही निवडणुकीच्या राजकारणातही मनसेचं इंजिन मनपात चालवणाऱ्या पुणे शहराला मनसेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक मानले जाते. हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी मनसेने आता कंबर कसली आहे. स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्या जोडीला मुंबईतून कुमक देण्यात येत असून स्वत: रा्ज ठाकरेही पुण्याच्या दौऱ्यावर पुन्हा येणार आहेत.

 

पुण्यात पुन्हा पाय जमवण्यासाठी ‘मनसे’ प्रयत्न

  • शिवसेनेत असल्यापासूनच राज ठाकरेंसाठी पुणे हे आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
  • पुण्यानेही मनसेला चांगली साथ दिली आहे.
  • २००९च्या विधानसभेला विधानसभेवर निवडून गेलेल्या १२ आमदारांपैकी एक पुणे जिल्ह्यातील होता.
  • २०१२ च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले होते.
  • मात्र, पुढे इथर महाराष्ट्राप्रमाणेच पुण्यातही मनसेचा प्रभाव ओसरत गेला.
  • तो पुन्हा मिळवण्यासाठीच गेल्यावर्षी आक्रमक आणि सतत विजयी होणारे नगरसेवक वसंत मोरे यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • मात्र, रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्यावेळी पक्ष सोडून अचानक धक्का दिला.

 

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्याची चर्चा!

  • आता पुन्हा संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी स्वत: राज ठाकरेंनी लक्ष दिले आहे.
  • राज ठाकरे २५ फेब्रुवारीच्या सुमारास पुण्यात येण्याची शक्यता आहे.
  • मनपा निवडणूक लक्षात घेत मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे.
  • तयारीचा भाग म्हणून प्रत्येक मतदारसंघात मनसे निरीक्षक नेमण्यात आले आहेत.
  • त्यावेळी ते आगामी पुणे मनपाच्या सर्वच जागा लढवण्याची घोषणेसह इतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही करण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली.

Tags: manaseMunicipal ElectionpuneRaj Thackerayपुणेमनसेराज ठाकरे
Previous Post

कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षापूर्वीच मंगेशकर कुटुंबीयांनी विकला, स्टुडिओ वाचवण्यासाठी आता साखळी उपोषण!

Next Post

सरकारची शिष्टाई, ग्रामसभेचा ठराव, अण्णा हजारेंचं वाईन विक्रीविरोधातील उपोषण मागे!

Next Post
Anna hazare

सरकारची शिष्टाई, ग्रामसभेचा ठराव, अण्णा हजारेंचं वाईन विक्रीविरोधातील उपोषण मागे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!