मुक्तपीठ टीम
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती आणि हनुमान चालिसाचे पठण केले. त्यांच्या या आरतीवरून जोरदार टीका होत असताना राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे तसेच ते पाच जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
औरंगाबाद हे शहर शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला प्रतिसाद देणारे मुंबई-ठाण्याबाहेरचे पहिले शहर होते, सत्ता देणारेही. त्यामुळे राज ठाकरेंची पुढची सभा ही त्याचा विचार करूनच असण्याची शक्यता आहे.
भोग्यांचा त्रास हिंदूना नाही तर मुस्लिमांना देखील…
- मला दोन घोषणा करायच्या आहेत.
- त्यासाठी मीही पत्रकार परिषद घेतली.
- देशभरातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे.
- त्याकडे तसंच पाहिलं पाहिजे.
- एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना सांगितलं की माझं लहान मुल जन्माला आलं तेव्हा सकाळच्या अजाण आणि बांग बंद करण्याबाबत मशिदीत जाऊन सांगितलं होतं.
- त्याचा लहान मुलाला त्रास होत होता.
- हा केवळ हिंदूना नाही तर मुस्लिमांना देखील त्रास होतो.
तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक!
- माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे.
- त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे.
- या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे.
- अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे.
- तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू.
- देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा.
- ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे.
- मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे.
- महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत.
- माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
- त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही.
राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा!
- महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
- तर ५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे.
- पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली.
भोंगा कायद्यापेक्षा मोठा का ?
- सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर अनाधिकृत आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनाधिकृत कशा मानता.
- मशिदिवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
- मुस्लिम समाजालाही समजले पाहिजे की या देशापेक्षा त्यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही.
- लोकांना त्याचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणे आवश्यक आहे.