डॉ. मनोज चव्हाण / व्हा अभिव्यक्त!
देशाच्या स्वतंत्रा पासून मेळघाटला आजही स्वतंत्र्याचा गोडवा अनुभवता आला नाही. याचे मुख्य कारण पिढीजात असलेले दारिद्र, बेरोजगारी, सर्व स्तरातून होणारे शोषण आणि कृत्रिम गुलामी! यामुळे आजही मेळघाट स्वतंत्र झाला नाही. निसर्गाचे जसे तीन ऋतू असतात, तसेच मेळघाटात कधी कुपोषण, रोजगारासाठी स्थलांतरण, उन्हाळ्यात भीषण पाणी समस्या, रोगराई, अंधश्रद्धेचे बळी, मानव वन्यजीव संघर्ष या समस्येचे ऋतू मेळघाटात वर्षानु वर्षापासून अविरत चालत आले आहे. अद्याप तरी कोणत्याही यंत्रणेला यापैकी कोणतिही समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यश आले नाही. पोटाच्या आजाराला, डोक्याची गोळी देवुन वेळकाढू धोरण शासकिय व्यावस्थेचे सुरू आहे. याचीच प्रचिती आज चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी येथे सुरू असलेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्युतांडवा वरून पुन्हा सिद्ध झाले. शवविच्छेदनात जरी पाचडोंगरी वासियांचा दुषित पाणी प्याल्याने मृत्यू झाला. परंतु, मृतकांच्या कुटुंबातील आणि गावकऱ्यांनी दुषित पाणी पिण्यासाठी कारणीभूत असलेल्या दुषित व्यवस्थेने जीव घेतल्याचे उघडपणे बोलत आहे. तसेच शेकडो नागरिक गंभीर आजाराशी झुंजत आहे. यालाही दूषित व्यवस्थाच जबाबदार आहे.
मेळघाटातील पाणी प्रश्नावर लक्ष घाला.
पाणीदूत डॉ @ManojBChavan5 आणि सहकारी मागील अनेक दिवसांपासून मेळघाटात पाणी पुरवठा करत आहेत.
दूषित पाणी पुरावठ्याकडे जातीने लक्ष घालण्यासाठी मनसेचे राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांना पत्र लिहिले आहे. #म #मराठी@mnsadhikrut pic.twitter.com/O09zpKszXE
— Office of Dr.Manoj Chavan (@manojchavanoffc) July 11, 2022
आपण मुख्यमंत्री म्हणून वेळीच दाखविलेली कार्य तत्परतेने सर्व शासन व्यवस्था पाचडोंगरीभोवती धावपळ आहे. तसेच आपण स्वत: कुपोषण आणि आरोग्य व्यवस्था समस्या मुक्तीसाठी मेळघाटला अनेक दौरे केलेत. मेळघाट वासियांच्या भीषण पाणी टंचाई व इतर समस्येवर अंतिम तोडगा तुम्ही नक्की काढावा. आणि मेळघाटमधील आरोग्य यंत्रणेमार्फत गावा गावातील पिण्याच्या पाणी स्त्रोतातील पाणी नमुने तपासणी करून, पिण्या अयोग्य गावातील पाणी समस्या सोडवावी. इतर कोणत्याच गावामध्ये पाचडोंगरीची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी यंत्रणेला सक्तीचे निर्देश देण्यात यावे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला कारवाईचे निर्देश
मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाचडोंगरी दुषित पाणी समस्ये बाबत पाठवलेल्या ई-मेल ला मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून, मुख्यमंत्री कार्यालयाने स्वच्छता विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांना सदर निवेदनावर कारवाई करण्याकरता निर्देश दिले आहे या संदर्भातला ई-मेल डाॅ. मनोज चव्हाण यांना प्राप्त झाला आहे.
ओकेचा नाही मेळघाटशी संबध
पाचडोंगरी येथील निष्पाप नागरिकांचे तडफळुन होत असलेल्या मृत्युची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न कुटुंबातील सदस्य गमावलेले
पाणावलेले डोळे विचारत आहे. एका तरुणांने आपल्या रक्ताच्या कुटूं प्रमुखा निरोप देतांना, राजकीय व शासकीय व्यवस्थेला सुनावलंय. मेळघाटमध्ये “काय झाडी, काय डोंगुर, काय दूषित पाणी, काय निष्पाप बळी…काय दुषित व्यवस्था, ओकेचा नाही मेळघाटमध्ये संबंध” असे ओरडुन हंबरडा फोडला.
(मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे)