Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन: “अक्षय तृतीयेला आरत्याही नको!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MNS (2)

मुक्तपीठ टीम

“मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे.” असे बजावून सांगणाऱ्या ट्रिझरसह दणक्यात पार पडलेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा आजही चर्चेचा विषय आहे. त्या सभेतील राज ठाकरेंचं भाषण ईदच्या दिवसापासून भोंग्यांवरील अजानविरोधातील आंदोलनाची डेडलाईन पुढे नेण्याची घोषणा करणारं होतं. आज त्याही पुढचं पाऊल उचलत राज ठाकरे यांनी अक्षय तृतीयेला कुठेही आरती करु नका, असेही बजावलं आहे. पुढे काय करायचं ते अक्षय तृतीयेलाच राज ठाकरे ट्विटरवर जाहीर करणार आहेत.

राज ठाकरेंचं आवाहन

उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच!

महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg

— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, मंदिरांवर असलेले भोंगे देखील उतरले पाहिजेत.
  • मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत.तशी माझी इच्छा देखील नाही.
  • लाऊडस्पीकर या विषयाला धार्मिक रंग देणार असेल तर आम्ही देखील धर्माने उत्तर देऊ. यूपीत भोंगे उतरले मग महाराष्ट्रात का नाही?
  • माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मलामध्ये यायचं नाही, मात्र ४ तारखेपासून ऐकणार नाही. ४ तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करणार.
  • संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना एकदा दाखवावीच लागेल.
  • शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधीच घेत नाहीत. शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. माझ्या सभांनंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली.
  • सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादीचे लोक काय बोलणार?
  • राज्यात जातीय विष शरद पवारांमुळे पसरल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला.
  • औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात घेणार.

Tags: Maha ArtipuneRaj Thackerayअक्षय तृतीयापुणेमहाआरतीराज ठाकरे
Previous Post

हॉलिवूडच्या ‘मॅट्रिक्स’ चित्रपटातील अद्वैत वेदांत!

Next Post

यूपीच्या मंत्रीमहोदयांना उंदिर चावला, साप चावल्याच्या भीतीने तब्येत बिघडली!

Next Post
up minister girish chandra was bitten by rat

यूपीच्या मंत्रीमहोदयांना उंदिर चावला, साप चावल्याच्या भीतीने तब्येत बिघडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!