मुक्तपीठ टीम
“मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे.” असे बजावून सांगणाऱ्या ट्रिझरसह दणक्यात पार पडलेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा आजही चर्चेचा विषय आहे. त्या सभेतील राज ठाकरेंचं भाषण ईदच्या दिवसापासून भोंग्यांवरील अजानविरोधातील आंदोलनाची डेडलाईन पुढे नेण्याची घोषणा करणारं होतं. आज त्याही पुढचं पाऊल उचलत राज ठाकरे यांनी अक्षय तृतीयेला कुठेही आरती करु नका, असेही बजावलं आहे. पुढे काय करायचं ते अक्षय तृतीयेलाच राज ठाकरे ट्विटरवर जाहीर करणार आहेत.
राज ठाकरेंचं आवाहन
उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच!
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, मंदिरांवर असलेले भोंगे देखील उतरले पाहिजेत.
- मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत.तशी माझी इच्छा देखील नाही.
- लाऊडस्पीकर या विषयाला धार्मिक रंग देणार असेल तर आम्ही देखील धर्माने उत्तर देऊ. यूपीत भोंगे उतरले मग महाराष्ट्रात का नाही?
- माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मलामध्ये यायचं नाही, मात्र ४ तारखेपासून ऐकणार नाही. ४ तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करणार.
- संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना एकदा दाखवावीच लागेल.
- शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधीच घेत नाहीत. शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. माझ्या सभांनंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली.
- सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादीचे लोक काय बोलणार?
- राज्यात जातीय विष शरद पवारांमुळे पसरल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला.
- औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात घेणार.