मुक्तपीठ टीम
मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ डिस्टन्स एज्युकेशनने (AIDOL) एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ३ डिसेंबर रोजी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी, विद्यार्थी १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यापीठाच्या मते, विद्यार्थी एमएमएस आणि एमसीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या लिंकद्वारे अर्ज करू शकतात.
यूजीसीकडून मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाच्या आयडॉल विभागाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. २०२१-२२ पासून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MMS) कोर्ससाठी ७२० जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (MCA) अभ्यासक्रमासाठी २००० जागांसाठी UGC द्वारे मान्यताप्राप्त. https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या लिंकद्वारे विद्यार्थी दोन्ही अभ्यासक्रमांची तपशीलवार माहिती जाणून घेऊ शकतात.