Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भोंदूगिरीचा प्रचार, अमिताभ बच्चन यांनी चूक दुरुस्त करावी!”

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Anis And crorepati

नंदकिशोर तळाशिलकर / व्हा अभिव्यक्त!

१६ नोव्हेंबर रात्री आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या टेलिव्हिजन शोमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा प्रयोग दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या समोर हा कथित चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी ह्या गोष्टीचं कौतुक केलं. मात्र, यामुळे अत्यंत चुकीचा आणि भोंदूगिरीचा प्रचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून करण्यात आला आहे. अंनिसने यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

तसंच अंनिसमार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडियो रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओत डोळ्यावर पट्टी बांधून वाचन करणारे महा अंनिसचे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहेत. विज्ञानाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या ह्या भोंदुगिरीला पालकांनी बळी पडू नये तसेच कौन बनेगा करोडपती ह्या शो ने घडलेल्या गोष्टी बद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रत्यक्षात ह्या कथित चमत्काराच्या मागचे विज्ञान आपल्या पुढच्या शो मधून लोकांच्या समोर दाखवावे असं आवाहनही अंनिसच्यावतीने करीत आहोत.

 

कोणते आहेत खटकणारे मुद्दे?

  • महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली चूक दुरुस्त करावी.
  • अशा अवैद्यानिक गोष्टीना आपल्या शो मध्ये थारा देवू नये.
  • ह्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे कि,डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यांच्या मध्ये मुलांचे मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवतो असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले आहे.
  • मिड ब्रेन(मध्य मेंदू)चे उद्दीपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात असा दावा मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो
  • विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे.
  • आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो ह्या भूलथापांना बळी पडून अनेक पालक हजारो रुपये ह्या मध्ये खर्च करत आहेत हे सर्व थांबवणे आवश्यक आहे.
  • डोळ्यावर पट्टी बांधली असता नाक आणि डोळे यांचे मध्ये जी जागा राहते त्यामधून बघून गोष्टी ओळखाल्या जातात.
  • जर हाताने दाब देवून डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर ह्या गोष्टी ओळखाता येत नाहीत हे अंनिसने अनेक वेळा सिद्ध केले आहे.
  • आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत.
  • अंध मुलांना देखील मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाही.
  • वैद्यकीयदृष्ट्या मिडब्रेन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टींचा आणि दिसण्याची क्रिया यांचा संबंध नसल्याने जैविक पातळीवर असल्याची माहिती देखील पत्रकात देण्यात आली आहे
  • केवळ संगीताचा वापर करून प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यास हरकत असण्याचे कारण नसून मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या नावाखाली चमत्काराचा दावा करून पालकांची आणि मुलांची फसवणूक करण्यास अंनिसचा विरोध आहे.
  • ही एक आधुनिक प्रकारची बुवाबाजी आहे.
  • काही वाहिन्यांवरून मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे जे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येत आहेत, त्याविषयी अंनिसतर्फे प्रसार भारतीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

महाअंनिसचे सरचिटणीस नंदकिशोर तळाशिलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यास वाहून घेतलेले असून अंनिसच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनासाठी सदैव कार्यरत असतात.

 

पाहा व्हिडीओ:

मिडब्रेन अॅक्टिव्हेशन सिद्ध करा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे २१ लाखांचे आव्हान!


Tags: amitabh bacchanKon Banega CrorepatiMaharashtra Anisअमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपतीमहाराष्ट्र अंनिस
Previous Post

तीन डिसेंबरला एमएमएस, एमसीएची प्रवेश परीक्षा…२५ नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज!

Next Post

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

Next Post
tadoba

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!