मुक्तपीठ टीम
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता समारोप नुकताच पार पडला. यावेळी “कॉलनी” चे लेखक सिद्धार्थ पारधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारधे यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितले आणि त्यांना त्यांचे आत्मचरित्र लिहिण्यास कशामुळे प्रोत्साहन मिळाले त्याबद्दलही चर्चा केली. ‘कॉलनी’ ही एका अश्या व्यक्तीची कथा आहे जो वांद्रे येथील प्रसिद्ध साहित्य सहवास कॉलनी बांधत असताना सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता. सिद्धार्थ यांना त्यांच्या अशिक्षित पालकांनी अभ्यासासाठी प्रवृत्त केले आणि मराठी साहित्यातील महान व्यक्तिमत्वांनी त्यांचे मार्गदर्शन केले. सामाजिक अडथळ्यांच्या पलीकडे जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व लढणाऱ्या व्यक्तीची ही कथा आहे. कॉलनी, सिद्धार्थ पारधे यांच्या आत्मचरित्राला २००९ साली केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला होता.
“मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मराठी आणि अमराठी भाषिक कर्मचार्यांच्या उत्साही सहभागाबद्दल मी कौतुक करतो”, असे एस.के. गुप्ता संचालक (प्रकल्प), मुं.मे.रे.कॉ म्हणाले आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी ए.ए.भट, संचालक (प्रणाली), अबोध खंडेलवाल, संचालक (वित्त), आर. रमणा, कार्यकारी संचालक (नियोजन), राजीव (रोलिंग स्टॉक), राजीव कुमार (सिग्नल आणि टेलिकॉम) आणि मुं.मे.रे.कॉ.चे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी निबंध लेखन, काव्य स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा, शुध्दलेखन, शब्दकोड आणि अभिवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये केवळ मुं.मे.रे.कॉ.च्या कर्मचार्यांनीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुरस्कार विजेते –
निबंध लेखन –
१) दयानंद चिंचोलीकर
२) गणेश घुले
३) नभा शिरोडकर
४) गौरी कार्तिकेय
घोषवाक्य स्पर्धा –
१) रेखा माझिरे
२) नूपूर चित्ते
३) सागर खोलमकर
४) ज्योती नायर
शुध्दलेखन –
१) आफरीन शेख
२) नीती तामसे
३) नभा शिरोडकर
४) प्रीता नायर
शब्दकोड –
१) गणेश पाटील
२) सुप्रिया मोरे
३) अश्विनी साळुंखे
४) नाजनीन शेख
प्रश्नमंजुषा –
१) योगेंद्र मोरे
२) मयूर कदम
३) अमित जांभळे
४) अर्शद नसीम
अभिवाचन स्पर्धा –
१) फराह इराणी
२) नभा शिरोडकर
३) योगेश गोताड
काव्य स्पर्धा –
१) नभा शिरोडकर
२) फराह इराणी
३) विवेक भारंबे (समाप्त)