मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा या मतदारसंघात निकाल लागला आहे. शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या या निवडणुकीत आघाडीतून लढणाऱ्या शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. ज्या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली होती, तिथंच पराभव पत्करावा लागला आहे. या जागेवर भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला आहे. वसंत खंडेलवाल यांना ४३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३३० मतं मिळाली आहेत. त्यात पुन्हा आघाडीची काही मते फुटल्याची चर्चा असल्यानं आघाडी शिवसेनेला फळलेलीच नाही.
‘अर्थ’पूर्ण प्रयत्नांमुळे
- नगरसेवकांसाठी आगामी निवडणुकीची सोय झाली!
- भाजपाचं कमळ फुलण्यात वंचित आघाडी, तसेच अपक्ष उमेदवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.
- दोन्ही उमेदवारांकडून या निवडणुकीत विजयासाठी केल्या गेलेल्या ‘अर्थ’पूर्ण प्रयत्नांमुळे नगरसेवकांना आगामी निवडणुकीसाठी सोय झाल्याची चर्चा आहे.
अकोला वाशिम बुलडाण्यात कमळ फुललं
- विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील २२ मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते.
- तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
- अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली.
- यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे.
- वसंत खंडेलवाल यांना ४४१ मते मिळाली आहेत त्यापैकी ३६ मते अवैध झाली आहत तर गोपिकिशन बजोरिया यांना ३३० मते मिळाली.
- शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते.
- गेल्या १८ वर्षापासून इथं युतीमधून शिवसेनेच्या उमदेवारांचा विजय झाला होता.
- युती नसताना झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत वसंत खंडेलवाल यांनी गोपिकिशन बाजोरियांना अस्मान दाखवलं आहे.
गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
- भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यानंतर निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते.
- वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात.
- वसंत खंडेलवाल यांनी सातत्यानं अकोला वाशिम बुलडाणा या तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी कायम जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे.
- त्यात पुन्हा आघाडीची काही मते फुटल्याची चर्चा असल्यानं आघाडी शिवसेनेला फळलेलीच नाही, अशी चर्चा करत शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत.