Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणूक: ऐनवेळी उमेदवार बदलाच्या ‘हात’चलाखीमुळे भाजपानं नागपूर आरामात राखलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mlc election bjp won, congress lost

मुक्तपीठ टीम

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलून राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित विजय मिळला आहे तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. ऐन मतदानाच्या आधी काँग्रेसने भाजपामधून आलेले छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी रद्द केली आणि मंगेश देशमुखांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाकडे असलेल्या मतांबरोबरच आघाडीचीही अनेक मते चंद्रशेखर बावनकुळेंना मिळाली, अशी चर्चा आहे.

 

नागपूरमध्ये भाजपाचा विजय

  • राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते.
  • भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती.
  • भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली.
  • तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते.
  • मात्र, मतदानाच्या १२ तासांआधी नागपुरात काँग्रेसने छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला.
  • मतदान फुटू नये म्हणून भाजपाने आपल्या नगरसेवकांना नागपूरमधून बाहेर नेले होते.
  • भाजपाला या निवडणुकीत विजय मिळाला आहे.

 

काँग्रेसने केली होती चमत्काराची भविष्यवाणी

  • भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला.
  • तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली.
  • भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार देशमुख यांना १८६ आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटली असल्याचे समोर आले.
  • काँग्रेसने सांगितला तसा चमत्कार झालाच, पण तो ऐनवेळी उमेदवार बदलाचा आणि आघाडीचीच मते फुटण्याचा झाला!

Tags: BJPchandrashekhar bawankuleChotu BhoyarCongressMangesh Deshmukhnagpurकाँग्रेसचंद्रशेखर बावनकुळेछोटू भोयरनागपूर स्थानिक स्वराज्य संस्थाभाजपामंगेश देशमुख
Previous Post

विधानपरिषद निवडणूक : युती नसल्यानं अकोला शिवसेनेनं गमावलं! वंचित, अपक्षांनी कमळ फुलवलं!

Next Post

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली !: सचिन सांवत

Next Post
sachin sawant opposed shifting of CBLE nagpur to Delhi

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली !: सचिन सांवत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!