Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील आमदार जेव्हा नौदलाच्या युद्धनौकेवर पोहचले…

November 11, 2022
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra MLA

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाचे कामकाज कसे चालते, युद्धनौकांचे संचलन कसे होते, युद्धनौकेवरील जवान कशा पद्धतीने खडतर परिस्थितीत कामकाज करतात, शोध आणि बचाव कार्यात भारतीय नौदल कशा पद्धतीने योगदान देते याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी आज विधानमंडळ सदस्यांना मिळाली. भारतीय नौदलाचा पश्चिम विभाग आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमांतर्गत युद्ध नौकेस भेट देण्याच्या या उपक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल, महादेव जानकर यांच्यासह भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल आर. स्वामिनाथन, रेअर ॲडमिरल महेश सिंह, नौसेनेच्या पश्चिम बेड्याचे कमांडींग ऑफिसर समीर सक्सेना आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Maharashtra MLA

आमदार संजय सावकारे, अमोल मिटकरी, आकाश फुंडकर, समाधान औताडे, राजेश एकडे, हरीश पिंपळे, शेखर निकम, अनिल भाईदास पाटील, कुमार आयलानी, वसंत खंडेलवाल, रोहित पवार, अभिमन्यू पवार, राजू पारवे, बाबासाहेब पाटील, नामदेव ससाणे, समीर कुणावार, राम पाटील रातोळीकर, लक्ष्मण पवार, गीता जैन, संजय शिंदे, साहसराम करोटे, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी सहभाग घेतला. नौदलाचे सामर्थ्य, त्याचे युद्ध कौशल्य आणि दैनंदिन जीवनमान याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला.

भारतीय नौदलाच्या आयएनएस चेन्नई, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस तेग आणि आयएनएस तबर या युद्धनौकांमधून समुद्र सफर करुन विधिमंडळ सदस्यांनी नौसेनेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

भारतीय नौदलाच्या विविध नौका नेहमीच युद्धसज्ज असतात. या सज्जतेची माहिती यावेळी देण्यात आली. आपत्तीच्या वेळी हेलिकॉप्टरमार्फत शोध आणि बचाव कार्य कशा पद्धतीने केले जाते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. रासायनिक, आण्विक किंवा जैविक हल्ला झाला तर त्यापासून बचावासाठी काय काय केले जाते याचे नाट्यरुपांतरणाद्वारे सादरीकरण करण्यात आले. मिसाईल फायरींगची माहिती देण्यात आली. जॅकस्टेल (एका युद्धनौकेवरुन दुसऱ्या युद्धनौकेवर जवानांचे किंवा युद्धसाहित्याचे स्थलांतर) याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यासाठी नौदल जवानांनी आयएनएस चेन्नईवरुन आयएनएस विशाखापट्टणमवर रोपवेद्वारे स्थलांतर केले.

शोध आणि बचाव कार्यातील अग्रणी चेतक हेलिकॉप्टर, पाणबुडी शोधक सिकींग ४२ ब्रेव्हो हेलिकॉप्टर यांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. सिंधुराज पाणबुडीचे संचलन करण्यात आले. त्याचबरोबर लढाऊ विमाने डॉर्निअर, मिग २९ के, चेतक, एएलएच, पी ८ आय, आयएल, सी किंग या विमानांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अँटी मिसाईल डिफेंड कसा केला जातो याची माहिती देण्यात आली. जहाजाद्वारे जहाजाला केला जाणारा तेलपुरवठा, युद्धनौकांवर होणारे हेलिकॉप्टरचे लँडींग, युद्धनौकेवरील उपलब्ध शस्त्रसाठा आणि दारुगोळा अशा विविध अनुषंगाने नौसेनेमार्फत युद्धनौकांद्वारे केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यात आली.      

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यावेळी म्हणाले की, देशाच्या संरक्षणात भारतीय नौदलाचे योगदान महत्त्वाचे आहे. नौदलाची ताकद, त्यांची क्षमता, त्यांचे अतुलनीय कार्य, नौदल जवानांचे योगदान, त्यांचे खडतर कामकाज आदी माहिती या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने घेता आली. यामुळे भारतीय नौदलाविषयीचा आदरभाव अजून दृढ झाला आहे. देशाची सुरक्षा भक्कम आहे याची खात्री झाली आहे. देशाच्या प्रती नौदलाचे आणि नौसैनिकांचे असलेले योगदान अनन्यसाधारण असे आहे, असे त्यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, नौदलाचे कार्य पाहून आपला देश सुरक्षीत हाती आहे याची खात्री पटली आहे. नौसैनिकांचे कामकाज प्रेरणादायी आहे. कुटुंबापासून दूर राहून नौसैनिक काम करतात. देशाच्या संरक्षण सज्जतेत त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.  नौसेनेसमवेत ‘एक दिवस समुद्रावर’ हा उपक्रम सर्वसामान्य नागरीकांसाठीही राबविण्यात यावा. यामुळे लोकांनाही लष्कराच्या कामकाजाची, सैनिक घेत असलेल्या कठोर परिश्रमाची आणि देशाप्रती असलेल्या त्यांच्या योगदानाची प्रत्यक्ष माहिती घेता येईल. आजच्या दौऱ्यामुळे नौसेनेच्या कामातून मोठी प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले.

Maharashtra MLA

सर्व आमदार, अधिकारी यांनीही नौसेनेच्या कामकाजाची माहिती घेतली आणि देशाप्रती असलेले त्यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या. आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर कॅप्टन म्हणून संदीप सिंह रंधाना यांनी कामकाज पाहिले. लेफ्टनंट परेश देशपांडे यांनी युद्धनौका आणि त्याच्या विविध क्षमतांविषयी माहिती दिली.


Tags: Indian NavyMaharashtraMaharashtra MLAmuktpeethNaval Warshipsघडलं-बिघडलंनौदल युद्धनौकाभारतीय नौदलमहाराष्ट्रमहाराष्ट्र आमदारमुक्तपीठ
Previous Post

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – दीपक केसरकर

Next Post
deepak kesarkar

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया - दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!