मुक्तपीठ टीम
अकरा वर्षांपासून एक तरुणी गायब असल्याची तक्रार करण्यात आली होती. आता ती तरुणी शेजारच्याच घरात सापडली आहे. ते घर तिच्या प्रियकराचेच असल्याचे कळते. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील अईलूर या गावातील ही घटना आहे.
घरातून ती तरुणी अकरा वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. जेव्हा अनेक प्रयत्न करून ती सापडली नाही, तेव्हा घरातल्यांनी आशा सोडली. आता त्यांना अचानक कळले की ती शेजारच्या घरातच आपल्या प्रियकरासोबत राहत होती. आश्चर्य म्हणजे मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनाही याबद्दल माहिती नव्हती.
अकरा वर्षांची फिल्मी पण रिअल स्टोरी
- अकरा वर्षांपूर्वी या जोडप्याची फिल्मी कथा सुरू झाली.
- साजिदा २०१०मध्ये घरातून गायब झाली.
- साजिता वयाच्या १९ व्या वर्षी बेपत्ता झाली होती आणि तिच्या घरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.
- ११ वर्षानंतर आता साजिताचा शोध लागला आहे.
- गायब झालेल्या साजिताचं घर हे रहमानच्या घरापासून केवळ ५०० मीटर अंतरावर आहे.
रहमानही बेपत्ता झाला
- मार्च २०२१ मध्ये रहमान आपल्या लपून-छपून चाललेल्या आयुष्याला कंटाळला.
- तेव्हापासून तोही बेपत्ता झाला.
- त्याच्या कुटुंबियांनीही तो गायब झालेल्याची तक्रार दाखल केली.
- एके दिवशी रहमानच्या भावाने त्याला रस्त्यावर पाहिले आणि त्याला घरी येण्यास सांगितले परंतु रहमानने नकार दिला.
- रहमानच्या भावाने पोलिसांना याची माहिती दिली व रहमानला पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
- रहमानने पोलिसांना संपूर्ण गोष्ट सांगितली. रहमानने सांगितले की तो एका भाड्याच्या घरात राहत आहे आणि साजितासुद्धा तिथेच राहते.
- २०१० पासून ते आतापर्यंतचे रहमान यांनी सर्व काही सांगितले आहे.
दहा वर्षे घरातील खोलीतच होते दोघे!
- अकरा वर्षांपूर्वी साजिता घर सोडून रहमानच्या घरी आली होती आणि तेव्हापासून दोघेही घरातील सदस्यांना न सांगता त्याच्या खोलीत राहत होते.
- रहमान नेहमी त्याच्या खोलीत असायचा आणि जेव्हा कोणी त्याच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करीत असे तेव्हा तो रागवायचा.
- तो स्वत:च्या खोलीतच जेवणही करत असे.
- बर्याच वर्षांपासून तो असंच राहत होता.
- खिडकीतून साजिता यायची आणि जायची
- आश्चर्य म्हणजे रहमानच्या खोलीत शौचालय किंवा स्नानगृह नाही.
- अशा परिस्थितीत घरातील सदस्य झोपल्यानंतर साजिता रात्री खिडकीतून बाहेर यायची.
- रहमान यांनी सांगितले की ते अशाप्रकारच्या जगण्याला कंटाळले, म्हणूनच मार्चमध्ये ते रहमानच्या खोलीतून पळून गेले.
सर्व तपासानंतर या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने तडजोड म्हणून या दोघांचे लग्न लावण्याचा सल्ला दिला. २९ वर्षीय साजिता आता ३४ वर्षीय रहमानसोबत भाड्याच्या खोलीत राहत आहे.