मुक्तपीठ टीम
मिरजच्या मिरासाहेब दर्गा हे परिसरातील सर्वधर्मीयांच्या श्रद्धेचं स्थान आहे. मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या दर्ग्याचा ऊरुस गेल्या ६४७ वर्षापासून साजरा केला जातो, असं सांगितलं जातं. या ऊरसाचा शुभारंभ चर्मकार समाजाकडून मानाचा पहिला गलेफ अर्पण करून होत होत असतो. हजरत ख्वाजा शमनामिरा मिरज दर्गाचा मानाच्या गलेफसाठी दर वर्षी चार राज्यातून भाविक येतात. हजारो भक्त दरसाल येतात गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने गर्दी मर्यादित होती. पण यावेळी निर्बंध शिथिल असल्याने गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आला.
नेहमी प्रमाणे मिरजेतील मधली गल्ली,सातपुते वाडा येथून गलेफला प्रारंभ झाला. मंडई मार्ग दर्गा कमान येते नगराखाना कमानीतून पार होत, दर्ग्यात प्रवेश होऊन सूर्योदयापूर्वी गलेफ अर्पण झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी नियोजन बाबू सातपुते, हिरालाल सातपुते, श्रीकांत सातपुते,प्रशांत सातपुते.विशाल सातपुते,दत्ता सातपुते,विजय सातपुते,शरद सातपुते,दीपक सातपुते,किरण सातपुते.तानाजी सातपुते,आदिने केले तर यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती आंनदा देवमाने,बबन दबडे,गंगाधर कुरणे,अनेक मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरजच्या मिरासाहेब दर्गा सर्वधर्मीयांच्या श्रद्धेचं स्थान
- मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळील मिरसाहेब दर्गा मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक श्रद्धेचं केंद्र आहे.
- हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात.
- हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते.
- ते मक्का येथून भारतात आले होते.
- दरवर्षी साजरा होणाऱ्या ऊरुस काळात लाखो लोक याठिकाणी येतात.