Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील म्हाडाच्या सिमेंट जंगलात बहरणार अस्सल मिनी जंगल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Majhi Vasundhara

मुक्तपीठ टीम

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व प्रकारची कार्यालये, गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात निसर्ग उपवन म्हणजेच मिनी जंगल निर्माण करावे अशी संकल्पना आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ही शहरी वनीकरणाची वेगळी संकल्पना आहे. या संकल्पनेतून वांद्रे येथील म्हाडा कार्यालय परिसरात मिनी जंगल निर्माण केले जात आहे. राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या वन महोत्सवाच्या निमित्ताने या मिनी फॉरेस्टचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

 

‘मिशन ग्रीन मुंबई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात येत असून येथे वाहनांच्या पार्किंगच्या सुमारे दोन हजार चौ. फूट जागेत ४० प्रकारची ३०० झाडे लावण्यात येत आहेत. ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून यात योगदान देणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

 

यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले, नुकतेच कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले तापमान हे वातावरणात होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. महाराष्ट्रातही वातावरणीय बदलांचे परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. हे का घडत आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुख्यमंत्री निधीसाठी ३१ लाखांची मदत

सध्या महाराष्ट्र विविध संकटांचा सामना करीत आहे. या परिस्थितीत शासनाला मदत म्हणून म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून जमा केलेल्या ३१ लाखांचा धनादेश घोसाळकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्री ठाकरे यांच्याकडे यावेळी सुपूर्त केला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Environment Minister Aditya ThackerayMajhi VasundharaMayor Kishori PednekarMini Forestmumbaiपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमहाराष्ट्रमिशन ग्रीन मुंबईमुख्यमंत्री सहायता निधी
Previous Post

घरबसल्या ऑनलाईन शिक्षणाच्या दिक्षा अॅपला जागतिक पसंती

Next Post

रेल्वेगाडीचं तिकिट, पण विमानतळाचा फिल, बदलणार रेल्वे स्टेशन

Next Post
Andheri railway station

रेल्वेगाडीचं तिकिट, पण विमानतळाचा फिल, बदलणार रेल्वे स्टेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!