मुक्तपीठ टीम
वय कितीही झालं तरी ज्यांचं व्यक्तिमत्व आकर्षकच राहतं अशांपैकी एक म्हणडजे लोकप्रिय एव्हर फिट मॉडल मिलिंद सोमण! मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कुंवर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या सकारात्मक पोस्टद्वारे ती लोकांना प्रेरणा देत असते. अनेकदा ती सामाजिक विषयांवरही आपले मत मोकळेपणाने मांडते. आता मात्र अंकितानं एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील दु:खद अनुभव लोकांसमोर मांडले आहेत.
अंकिताचा सोशल मीडियावर भावनांचा उद्रेक
- अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.
- यामध्ये तिनं आपल्यावर ओढावलेल्या दु:खाचे वर्णन केलं आहे.
- लहानपणी माझा छळ झाला, मी वसतीगृहात वाढले. परदेशात एकटी राहत होते.
- ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला.
- मी माझा एक भाऊ गमावला, एक्स बॉयफ्रेंड गमावला, वडील गमावले.
- माझ्या दिसण्यावरून मला अनेक नावांनी हाक मारली जात होती.
- मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत असण्यावरून लोक मला जज करतात.
- तरीही तुम्ही जर माझ्याकडे आशावादी म्हणून पाहत असाल तर लक्षात ठेवा की मी आहेच!
- स्वत:वर प्रेम करा, असं तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
अंकिताचा पती मिलिंद सोमण याने लिहिलं की, बेबी, तू आता त्यातून खूप पुढे आली आहेस. त्यावर रिप्लाय देताना अंकिता म्हणाली की, शुक्रिया मेरे साथी.
मिलिंद – अंकिताची लव्ह स्टोरी!
- अंकिता कोंवरने २०१८ मध्ये मॉडेल मिलिंद सोमणशी लग्न केले होते.
- या दरम्यान अंकिता अवघ्या २६ वर्षांची होती तर मिलिंद ५२ वर्षांचा होता.
- दोघांच्या वयातील या मोठ्या अंतरामुळे दोघांनाही ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले.
- दोघेही अनेकदा त्यांच्या रोमँटिक पोस्टसह सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.