मुक्तपीठ टीम
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्यात सामान्यांपासून, नेते आणि कलाकारही बाधित होत आहेत. अशात मॉडेल, अभिनेता आणि मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. स्वत: मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन सांगितले आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “कमी वेगाने पाच किलोमीटर धावणे ४० मिनिटांत पूर्ण केले, पुन्हा धावू शकलो ही दिलासादायक बाब आहे”.
View this post on Instagram
मिलिंद सोमणने ही व्हिडीओ पोस्ट केली असून त्यात त्याने कोरोना संसर्गावरील उपचारादरम्यानचा अनुभव मांडला आहे. “२५ वर्षांत कोणत्याही फ्लूने म्हणजे तापाने स्पर्शही केलेला नाही, परंतु कोरोनामुळे खूप त्रास सहन करावा लागला”,
कोरोना कधी झाला कळलेच नाही…
- मिलिंद सोमणची २५ मार्चला आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
- त्याने ही माहिती इंस्टग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांना दिली होती.
- त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मला कोरोनाचा संसर्ग कधी झाला हे कळले नाही. कोरोनामुळे घरूनच कामे चालली होती. फक्त सकाळी धावण्यासाठी घरातून निघायचो.
- २३ मार्चला शरीरातील ऊर्जा कमी झाली. सौम्य डोकेदुखीसह शरीरातील तपमान ९८ डिग्री झाले. त्यानंतर आरटीसीआर चाचणी केल्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले.
वय पंचावन, ह्दय जवान…मिलिंद सोमण!
- मिलिंद सोमण ५५ वर्षांचा आहे
- व्यवसायाने मॉडेल, अभिनेते आहेत
- वयाच्या ५२ व्या वर्षी निम्म्या वयाच्या अंकिता कोंवर या एअर होस्टेस तरुणीशी लग्न केले
- अंकिताच्या आई-वडिलांचेही वय मिलिंदपेक्षाही कमी असल्याने खूप चर्चा झाली होती.
- आपल्या फिटनेसमुळे मिलिंद तरुणाईच्याही पसंतीस उतरतो
- फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याने अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये जगातील सर्वात कठीण धावण्याची शर्यत पूर्ण केली होती.
- या ५१७ कि.मी. शर्यतीत १० किमी जलतरण, १४८ किमी सायकलिंग आणि ८४ कि.मी. धावायचे होते.
- तीन दिवसांची ही शर्यत त्यांने अनवाणी पूर्ण केली होती.
- मिलिंदच्या नावावर आणखीही अनेक विक्रम आहेत.