मुक्तपीठ टीम
भारताची स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स भारतीय मार्केटमध्ये मायक्रोमॅक्स इन २बी हँडसेट लॉन्च करण्यात केला आहे. हा फोन इन सिरीजमधील चौथा हँडसेट आहे. याआधी कंपनी इन नोट १, इन १बी आणि इन १ स्मार्टफोन्स लॉन्च केले होते. मायक्रोमॅक्स इन २बी ला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट केले आहे. लॉन्च करण्याआधी याचे कलर्स, वेरिएंट्स आणि डिजाइन ची माहिती लीक झाली होती. तर चला जाणून घेऊया मायक्रोमॅक्स इन २बी चे लॉन्च डीटेल्स आणि फीचर्स:
मायक्रोमॅक्स इन २बी चे फीचर्स
- मायक्रोमॅक्स इन २बी मध्ये ६.५ इंचचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे.
- सोबतच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे.
- फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि १०डब्ल्यू चार्जिंग सपोर्ट आहे.
- फोनमध्ये ५००० एमएएच ची बॅटरी आहे.
- ही बॅटरी ५० तासापर्यंतचा टॉकटाइम, १६० तासाचा म्यूजिक प्लेबॅक, १५ तासाची व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि २० तासाची वेब ब्राउजिंग सिंगल चार्जिंगमध्ये मिळेल.
- फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर आहे.
- फोटोग्राफी साठी फोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ड्यूल-कॅमेरा सिस्टिमचा समावेश आहे.
- ८ मेगापिक्सलचां फ्रंट कॅमेरासुद्धा आहे.
- हा फोन ऑक्टा-कोर यूनिसॉक टी६१० प्रोसेसर आहे.
- हा फोन ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे.