Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन, साडेसहा इंचाचा स्क्रिन, किंमत चकित करणारी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Micromax in 2C

मुक्तपीठ टीम

सध्याचा काळ हा स्मार्टकाळ. स्मार्टजीवन जगण्यासाठी स्मार्टफोनही तितकाच महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी आहे. देशांतर्गत कंपनी असलेल्या मायक्रोमॅक्सने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन २सी लॉंच केला आहे. मायक्रोमॅक्सच्या मायक्रोमॅक्स इन २सी मध्ये फेस अनलॉक आणि ड्युअल रियर कॅमेरा सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय या फोनमध्ये ६.५२ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.

मायक्रोमॅक्स इन २सीचे खास फिचर्स

  • याच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, मायक्रोमॅक्स इन २सीमध्ये ६.५३ इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे.
  • डिस्प्लेची शैली वॉटर ड्रॉप आहे. डिस्प्ले टच जलद आहे.
  • यामध्ये अॅंड्रॉईड ११ देण्यात आले आहे, जो अॅंड्रॉईड स्टॉक आहे म्हणजेच फोनमध्ये अनावश्यक थर्ड पार्टी अॅप्स मिळणार नाहीत.
  • शाओमी ते सॅमसंग आणि रिअॅलिटीमधील फोनमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा स्टॉक अॅंड्रॉईड मिळणार नाही.
  • फोनमध्ये ३ जीबी रॅमसह ३२ जीबी स्टोरेज आहे, जरी मेमरी कार्डच्या मदतीने ते २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता.
  • मेमरी कार्डसाठी वेगळा स्लॉटही मिळेल. फोनमध्ये यूएनआयएसओसी टी६१० प्रोसेसर उपलब्ध आहे, जो ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
  • यापूर्वी हा प्रोसेसर इनफिनिक्स हॉट ११ २०२२ आणि रिअलमीच्या सी२५वाय व्यतिरिक्त नोकियाच्या एंट्री लेव्हल फोनमध्ये दिसला आहे.

मायक्रोमॅक्स इन २सी कॅमेरा फिचर्स

  • कॅमेरा बद्दल सांगायचे तर, या मायक्रोमॅक्स फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेंस ८ मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स पोर्ट्रेटसाठी आहे.
  • तसेच कंपनीने दुसऱ्या लेन्सच्या मेगापिक्सलबद्दल माहिती दिलेली नाही. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
  • पोर्ट्रेट, ब्युटी, एआय, नाईट, क्यूआर कोड स्कॅनर आणि स्लो मोशन असे अनेक मोड कॅमेरासोबत उपलब्ध असतील.

मायक्रोमॅक्स इन २सी बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी फिचर्स

  • बॅटरी आणि कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, यात १० वॅट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच बॅटरी आहे.
  • सुमारे अडीच तासांत बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोन वायफाय, २जी, ३जी आणि ४जीला सपोर्ट करतो.
  • फोनमध्ये सिंगल स्पीकर, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे. फोनचे एकूण वजन १९८ ग्रॅम आहे.

मायक्रोमॅक्स इन २सीची किंमत

मायक्रोमॅक्स इन २सीची किंमत ७ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे, ही लाँचिंग किंमत आहे. नंतर त्याची किंमत ८ हजार ४९९ रुपये असेल. मायक्रोमॅक्स इन २सीची पहिली विक्री १ मे २०२२ रोजी होईल, जरी कंपनीने या क्षणी विक्री कोणत्या प्लॅटफॉर्मवर होईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: good newsLatest TechMicromaxmicromax in 2cmuktpeethचांगली बातमीमायक्रोमॅक्समायक्रोमॅक्स इन २सीमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

टीव्ही अभिनेत्रीची प्रेरणा कथा…कर्करोग बाधा ऐन तारुण्यात, हसत-हसत केली मात!

Next Post

सीमा सुरक्षा दलात आर्किटेक्ट, इंजिनीअर इंस्पेक्टर पदांवर भरती!

Next Post
bsf

सीमा सुरक्षा दलात आर्किटेक्ट, इंजिनीअर इंस्पेक्टर पदांवर भरती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!