मुक्तपीठ टीम
गेल्या तीन वर्षापासून मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबईकरांना आपल्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी म्हाडा घरांची लॉटरी घेऊन येत आहे. जुलै २०२२ मध्ये म्हाडा मुंबईत ४ हजार घरांची सोडत काढणार आहे. त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. ४ हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील.
कुठे आहेत म्हाडाची घरं?
- म्हाडाची ही घरं गोरेगावच्या पहाडी परिसरात आहेत.
- ४ हजार घरांपैकी सर्वाधिक घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील.
- तीही वन बीएचके असतील.
- २३ मजल्यांच्या सात इमारतींमध्ये १२३९ घरं उपलब्ध असतील.
- उन्नतनगर क्रमांक २ इथेही अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरं असतील तर अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे असतील.
- मध्य उत्पन्न गटासाठी २२७ घरी उपलब्ध असणार आहेत.
- तर उच्च उत्पन्न गटामध्ये १०५ घरांचा समावेश असेल.
- गोरेगावनंतर म्हाडाकडून अँटॉप हिल, कन्नमवारनगर तसच दक्षिण मुंबईतल्या घरांचाही सोडतीत समावेश केला जाणार आहे.
- जवळपास १ हजार घरं या भागात उपलब्ध होणार आहेत.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी संधी
- गेल्या तीन एक वर्षांपासून मुंबईत म्हाडाने घरांची सोडतच काढलेली नाही.
- त्यातही अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरेच उपलब्ध नसायची.
- त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किंमती आणि बिल्डर्सच्या घरांच्या किंमतीत फार फरक असायचा नाही.
- ती कसर कदाचित आता भरुन निघण्याची शक्यता आहे.
- कारण तीन वर्षानंतर अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन हजार घरं असतील.
- म्हाडाने याआधी २०१८ साली सोडत काढली होती.
- त्यावेळेस फक्त २१८ घरं होती.
- पण आता ४ हजार घरं असतील.
- जुलैमध्ये ज्या घरांची सोडत निघणार आहे, त्याचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.