मुक्तपीठ टीम
सध्याचा काळ हा ई-कारचा काळ आहे. रोजच एका नव्या ई-कारची बातमी मिळत असते. पण कार शौकिनांच्या मनात वेगळे स्थान असणाऱ्या एमजी लवकरच एक नवी ई-कार लाँच करत आहे. या ईव्हीची डिझाईन तरुण कार शौकिनांचे लक्ष वेधून घेणारी आहे. एमजी सायबरस्टर केवळ तीन सेकंदात १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. काही बातम्यांमध्ये असाही दावाही केला जात आहे की एमजीची ही नवी ईव्ही फुल चार्ज केल्यानंतर सुमारे ८०० किमीची ड्राईव्हिंग रेंज देऊ शकेल. हे खरं असेल तर भन्नाटच म्हणावं लागेल.
मजी सायबरस्टरच्या ग्लोबल डेब्यू अगोदर कारच्या काही झलक पाहायला मिळाल्या आहेत. या दोन दरवाजांच्या कारची झलक चित्तवेधक ठरली. तिचा लुक या कारला ईव्ही मार्केटमध्ये गेम चेंजर ठरवू शकतो.
एमजीच्या ईव्हीचं रुपचं न्यारं
• या कारला एक आकर्षक स्पोर्ट्स कॅटेगरीचा फील आहे.
• यात फुल-बॉडी पॅनेल्स, फ्रंटवर आकर्षक लाइन आणि समोर स्लिम ग्रिल डिझाईन आहे.
• ‘मॅजिक-आय’ इंटरएक्टिव हेडलाइट्स, एलईडी लाइट्स आणि इतर बारीकसारीक फीचर्स आहेत. लॉन्चनंतर कार ईव्ही सेगमेंटमध्ये स्टाइल स्टेटमेंट ठरेल.
• एमजी सायबर्स्टरचा मागील भाग एमजी बॅजसह चपटा आणि वक्राकार दिसतो. जो या कारच्या स्पोर्ट्स लूकला पूरक आहे.
एमजीच्या या सुपर ईव्हीची हाय-परफाॅरमन्स व्हील कंबाइड सेंट्रल लॉकिंग सिस्टमसह येतात. सहसा ही मॅकनिझम अत्यंत हाय-परफाॅरमन्स कारमध्ये आढळते. परंतु एमजी सायबरस्टरमध्ये हे वेगळेपण आहे. एमजी साइबरस्टर ही गेमिंग कॉकपिटसह जगातील पहिली प्यूअर सुपर कार आहे.
पाहा व्हिडीओ: