Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी सरकारची नवीन योजना

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
animals

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसंबंधित उद्योग करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने त्यांच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. ही योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने सुरू केली आहे. “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. या योजनेतून गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी आवश्यक शेडच्या बांधकामासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

 

ही योजना ३ फेब्रुवारी २०२१ पासून शासन निर्णयानुसार राज्यात राबविण्यास सुरूवात केली आहे. जाणून घेऊया नेमकी ही योजना काय आहे आणि याचा लाभ कसा घ्यावा,

 

या कामांसाठी मिळणार अनुदान

• गाय, म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे
• शेळीपालनासाठी शेड बांधणे
• कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे
• भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग

 

महात्मा गांधी रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत मिळणार अनुदान

• महात्मा गांधी रोजगार हमी योजना (रोहयो) अंतर्गत आणि काही योजनांच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमरुद्धी योजना राबविण्यात येणार आहे.

• गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी २ ते ६ गुरांसाठी एक गोठा बांधकामासाठी ७७१८८ रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.

• तर ६ पेक्षा अधिक म्हणजे दुप्पट १२ गुरांसाठी ही रक्कम त्यापटीत वाढून मिळणार आहे.

 

१० शेळ्या आणि त्यासाठी लागणाऱ्या बांधकामाला या योजनेत ४९२८४ रुपये अनुदान देण्यात येत. तसेच २० शेळ्यासाठी ही रक्कम दुप्पट स्वरुपात दिली जाणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे १० शेळ्याच्या पालन पोषनाची सोय नसेल त्यांनी २ शेळ्यासाठी अर्ज केल्यास याचा लाभ घेता येतो. असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

कुक्कुटपालन शेड बांधकाम १०० पक्ष्यांकरता शेड बांधण्यासाठी ४२७६० अनुदान दिले जाणार आहे. याचबरोबर १५० पेक्षा जास्त पक्षी असल्यास ही रक्कम दुप्पट होणार आहे. एखाद्याकडे १०० पक्षी नसल्यास तो १०० च्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांची सही घेत शेडची मागणी करू शकतो पण शेडचे काम झाल्यावर त्यास १०० पक्षी आणणे बंधनकारक राहणार आहे.

 

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १०५३७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. या चारही कामांमधील बांधकामाच्या अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

 

असा अर्ज करावा

• या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.

• सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची.

• त्याखाली ग्रामपंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे.

• त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा, ज्यासाठी अर्ज करणार आहे त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे.

• यानंतर आपली वैयक्तिक माहिती यामध्ये भरायची आहे. याचबरोबर तुम्ही जो प्रकार निवडाल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावाही त्यासोबत जोडायचा आहे.

• लाभार्थ्यांच्या नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून सातबारा, आठ – अ आणि ग्रामपंचायत नमुना र जोडायचा आहे.

• लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्यास रहिवासी दाखला जोडायचा आहे. तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का, ते सांगायचे आहे.

• यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीचं एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे.

• यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल.

• यात तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ते नमूद केले जाईल . याचबरोबर तुम्ही मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तसे नमुद करणे गरजेचे आहे .

 

पाहा व्हिडीओ:


Tags: animalsgovernmenthusbandrymuktpeethscheme
Previous Post

‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळलात? आता ‘वर्क विथ नेचर’!

Next Post

एमजीची ई-कार, एका रिचार्जमध्ये ८०० किमी, १००चा वेग

Next Post
e car

एमजीची ई-कार, एका रिचार्जमध्ये ८०० किमी, १००चा वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!