मुक्तपीठ टीम
एमजी मोटरने नवी एसयूव्ही एस्टर बाजारात आणली आहे. ही गाडी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजीवाली आहे. एमजी आता एस्टरच्या लाँचिंगमुळे कॉम्पॅक्ट एसयूवी सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे. एस्टर ही भारतामध्ये उपलब्ध असलेली एमजीची सर्वात स्वस्त कार असेल.
एमजीचं वैशिष्ट्य असणाऱ्या इतर तंत्रज्ञानाबरोबरच कारच्या आत कनेक्टिव्हिटी वाढवणाऱ्या नव्या सुविधा असतील. एमजीने रीयल-टाइम इंफोटेनमेंट आणि टेलीमॅटिक्ससाठी कारमध्ये आयओटी टेक्नोलॉजी दिली आहे. जियोच्या मदतीनं ई-सिमच्या मदतीने ४जी कनेक्टिव्हिटी पुरवली आहे.
ईलेक्ट्रिक कारचे पेट्रोल मॉडेल
- एमजी एस्टर एसयूवीमध्ये इंटरनल कंबशन इंजिन आहे.
- ही कंपनीची इलेक्ट्रिक कार एमजी झेडएस ईवीचे पेट्रोल इंजिन मॉडेल आहे. एमजी एस्टरमध्ये पहिल्यांदा आयटी सिस्टीम सादर करत आहे.
- रीयल-टाइम इंफोटेनमेंट आणि टेलीमैटिक्स साठी रिलायंस जियोने ई-सिम आणि एलओटी टेक्निक दिली आहे.
क्रेटा – किया सेल्टसशी स्पर्धा
- एमजी एस्टर एसयूवी मध्ये १.५-लीटर पेट्रोल इंजिन असेल.
- हे जवळ १४१ बीएचपीचे पॉवर आणि २४० एनएमचे पीक टॉर्क जेनरेट करेल. एस्टरमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि सीवीटी ऑटोमॅटिक सोबत लॉन्च करण्याची शक्यता आहे.
- कारची तुलना हुंदाईची क्रेटा आणि किया सेल्टस सोबत होऊ शकते.
कारच्या आत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एमजीने रीयल-टाइम इंफोटेनमेंट आणि टेलीमैटिक्स पर्यंत पोचण्यासाठी कारमध्ये आयओटी टेक्नोलॉजी सोबत ई-सिमच्या मदतीने ४जी कनेक्टिव्हिटी साठी रिलायंस जियो ने हाथ मिळवले आहेत.
कारमध्ये फ्रंट आणि रियरमध्ये एलईडी लॅम्प, डीआरएल, अलॉय व्हील, ८-इंचचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, आय-स्मार्ट कनेक्ट सोबत डिजिटल कंसोल, सनरूफ सोबत खूप फीचर्स दिले आहेत.परंतु, एमजी एस्टरच्या किंमतीला घेऊन अजूनपर्यंत काही उघड केलेले नाही.