Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो…”

सातत्यानं होणाऱ्या टीकेमुळे राष्ट्रवादीही चित्रा वाघांविरोधात आक्रमक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ncp

मुक्तपीठ टीम

२०१९पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक चेहरा असणाऱ्या चित्रा वाघ निवडणुकीआधी भाजपात गेल्या. त्याआधी भाजपा सत्ताकाळात त्यांच्या मनपा अधिकारी असणाऱ्या पतीविरोधात लाचलुचपत खात्याने कारवाई केल्यामुळे त्यांना भाजपात जावं लागलं असे आरोपही झाले. पण गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना सोडल्यानंतर मूळच्या पक्षांवर सतत तुटून पडणाऱ्या नारायण राणेंप्रमाणेच भाजपा चित्रा वाघ राष्ट्रविरोधात आक्रमक भूमिकेत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या आरोपांमुळे घायाळ झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांच्यासारख्या नेत्यांनी आक्रमक प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याची चुणूक वाघांनी नव्यानं लक्ष्य केलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमादरम्यान पाहण्यास मिळाली.

चित्रा वाघांची राष्ट्रवादीतील हिटलिस्ट

  • मेहबुब शेख
  • धनंजय मुंडे
  • जितेंद्र आव्हाड
  • निलेश लंके

कोरोना काळात केलेल्या कामांच्या प्रसिद्धीमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकें लोकप्रिय झाले. राष्ट्रवादी काँग्रेस साध्या राहणीमानाच्या या आमदाराला आर आर पाटील उर्फ आबांसारखं सामान्यातील नेतृत्व म्हणून लोकांच्या मनात रुजवत असल्याचीही चर्चा होती. तेवढ्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी लंकेंवर आरोप केले. त्यानंतर चित्रा वाघ यांनी लंकेंवर आक्रमक आरोप केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते आहे, म्हणजे त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांना वाट्टेल ते गुन्हे करायचा अधिकार मिळाला आहे का, असा हल्लाबोलही केला. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता चित्रा वाघ यांना तसंच प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

वाघांच्या भाषेतच शेखांची टीका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केली आहे. “चित्रा वाघ यांच्या पतीच्या बेहिशोबी मालमत्तेचा हवाला देत, वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका मेहबूब शेख यांनी केली आहे.

काय म्हणाले मेहबूब शेख?

  • “अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे.
  • अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा.
  • महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?
  • राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा.

 

मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद

  • “तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत.
  • आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा.
  • तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते.
  • मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय.
  • तुमच्या नवऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली.

सामान्य कुटुंबातील नेता पुढे जाणं खुपतं!

  • सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पुढे जात असेल तर ती गोष्ट कुणाच्या तरी डोळ्यात खुपते
  • “लंके यांच्यावर आरोप झाला मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं अस्तिव निर्माण करत असेल त्यावेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असते.
  • “पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपाऱ्या द्यायचे.
  • मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते.
  • लंकेचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडलं गेलं असून माझ्यावरही असेच आरोप झाले.
  • तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात.

चित्रा वाघांनी नवऱ्याच्या नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारावं!

  • “ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की माझी नार्को टेस्ट करा.
  • दोषी असेल तर मला चौकात फासावर चढवा…
  • जसं मी पुढे येऊन सांगतोय तसं तुम्हीही पुढे येऊन सांगा,
  • माझा नवरा दोषी नाही… त्याची देखील नार्को टेस्ट करा.
  • तसेच चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सर्व लोक ओळखतात. कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नसून भाजपचे लोक सांगतात तुमचं नाव करायचं असेल तर ५ कोटी द्या, अशी मागणी त्या करतात.
  • अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत… योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेल.

Tags: BJPBJP chitra waghDhananjay MundeMehboob ShaikhNCPncp mla Nilesh lankeज्योती देवरे
Previous Post

“गणेशोत्सव काळात मोहीम स्तरावर लसीकरण करा”: छगन भुजबळ

Next Post

बैल पोळ्याच्या निमित्तानं…सुपभर गहू मागावे लागतील…

Next Post
bail pola

बैल पोळ्याच्या निमित्तानं...सुपभर गहू मागावे लागतील...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!