Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पश्चिम-मध्य-हार्बर मुंबईच्या तीन रेल्वेमार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
local

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांनो रविवारी लोकलने कुठे फिरायचा, कुठे जायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम-मध्य-हार्बर मुंबईच्या तीन रेल्वेमार्गांवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. माटुंगा मुलुंड अप – डाउन धीम्या मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. हार्बर रेल्वेच्या कुर्ला आणि वाशी अप-डाऊन मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीमा मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी माटुंगा ते मुलुंडदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. दरम्यान लोकल १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तर सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.


Tags: Central RailwayHarbour RailwaymumbaiMumbai localsundayWestern Railwayपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेमुंबईमुंबई लोकलमेगाब्लॉकहार्बल रेल्वे
Previous Post

बुद्धिवान, कर्तृत्ववान, रयतहितदक्ष शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे आणि बदनामीचं कपटी चक्रव्यूह!

Next Post

#मुक्तपीठ #Live काँग्रेस नवसंकल्प शिबिरात काय ठरलं?

Next Post
#मुक्तपीठ #Live   काँग्रेस नवसंकल्प शिबिरात काय ठरलं?

#मुक्तपीठ #Live काँग्रेस नवसंकल्प शिबिरात काय ठरलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!