मुक्तपीठ टीम
काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे, काँग्रेसचा विचार हाच देशाला तारणारा विचार असून हा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला पाहिजे. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र जनमानसाची ‘शिदोरी’ या मासिकातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे कार्यक्रम व पक्षाशी संबंधित माहितीपूर्ण लेख प्रकाशित केले जातात. शिदोरीच्या नवनियुक्त संपादकीय मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली, यावेळी शिदोराला नवे रुपरंग देण्यावर चर्चा झाली.
जनसामान्यांचे प्रतिबिंब शिदोरीमध्ये दिसले पाहिजे तसेच राष्ट्रीय, राज्य पातळीवरील ज्वलंत विषयांची मांडणी करणे, राजकीय सामाजिक विषयावरील लेखांचाही समावेश करावा अशी सांगोपांग चर्चा यावेळी झाली.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिदोरीच्या नवनियुक्त संपादक मंडळाची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला मुख्य संपादक माजी आ. उल्हासदादा पवार, समन्वयक प्रमोद मोरे, देवानंद पवार, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे, संपादकीय मंडळाचे सदस्य न. मा. जोशी, प्रशांत गावंडे, डॉ. स्मिता शिरपूरकर, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे आदी उपस्थित होते.