मुक्तपीठ टीम
ई-कॉमर्स कंपनी मीशोने खरेदीदारांना छोट्या क्षेत्रातील विक्रेत्यांसह जोडण्यासाठी सरकारच्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स’ या उपक्रमासह एकीकरणाची घोषणा केली. मीशो कंपनीने ही माहिती दिली आहे.
सरकार ओएनडीसीचा एक पायलेट प्रोजेक्ट चालवत आहे, जिथे सर्व ई-कॉमर्स कंपन्या स्पर्धात्मक किंमतीत वस्तू आणि सेवांची ऑनलाइन खरेदी सुलभ करतील. ज्यामुळे विक्रेते आणि ग्राहकांवरील खर्चाचा भार कमी होईल. मीशोसह पायलट प्रोजेक्ट प्रथम बंगळुरूमध्ये लॉंच केला जाईल आणि येत्या काही महिन्यांत हळूहळू इतर ठिकाणी विस्तारित केले जाईल.
तसेच, ओएनडीसीचे सीईओ टी कोशी म्हणाले, “भारतात ई-कॉमर्स क्षेत्र अजूनही खूप लहान आहे आणि या प्रवासात मीशो सारखे नवीन प्लॅटफॉर्म ओएनडीसीसाठी मजबूत नेटवर्क भागीदार ठरेल.
छोट्या क्षेत्रातील विक्रेत्यांसह खरेदीदारांना जोडण्याचा मिशोचा संकल्प!
- प्रत्येकासाठी ई-कॉमर्स सुलभ करण्याच्या मीशोच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने, हे एकत्रीकरण लहान-क्षेत्रातील पुरवठादारांसाठी एक व्यापक बाजारपेठ तयार करताना ग्राहकांसाठी उत्पादन शोध आणेल.
- हे एकत्रीकरण लहान विक्रेत्यांना सक्षम बनवेल.
- तसेच, छोट्या क्षेत्रातील व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या समान उद्दिष्टांसह प्रत्येकासाठी इंटरनेट-आधारित व्यवसायाचा विस्तार करणे हा आहे.
मीशोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विदित अत्रे, यांनी एका निवेदनात म्हटले की, हा उपक्रम प्रत्येक व्यावसायिकाला आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देईल.