Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गरिबाला स्वस्त गॅस, रेशन नाही – मेडशीच्या महिलांची व्यथा

November 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
Bharat Jodo Yatra In Medshi

मुक्तपीठ टीम

“गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ?” हा प्रश्न आहे मेडशीच्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडलेला. त्या शेतमजूर आहेत. अशिक्षित आहेत. राजकारणाशी संबंध नाही. पण राहुलजींचे भाषण ऐकायला उपस्थित होत्या.
Bharat Jodo Yatra In Medshi
रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला जातो. पण सरकारने आमचे रेशन बंद केले आहे. आता गहू, तांदुळ, ज्वारी सगळंच महागलेय. गळ्यातले सोने ठेऊन आम्ही गॅस सिलेंडर घेतला होता. स्वस्तात गॅस मिळेल अशी आशा होती. पण गॅस 1200 रुपये झाला. दिवसभर कष्ट करून रोज दोनशे कमवणारे गॅस घेऊ शकत नाहीत. आता पुन्हा आम्ही चूल पेटवली आहे. म्हणून गरिबाला रेशन आणि गॅस स्वस्तात मिळायला हवा, असे त्या म्हणाल्या.
Bharat Jodo Yatra In Medshi
मेडशीत अनेक महिलांची अशीच स्थिती. येथील ८० टक्के कुटुंबे शेतमजुरीवर गुजरण करतात. त्यांना राहुलजी गरिबांसाठी काहीतरी करतील याची खात्री आहे.

भारत जोडो यात्रा बुधवारी रात्री अकोला जिल्ह्यातील पातूर येथे दाखल झाली होती. गुरुवारी सकाळी सहा वाजता पातूर येथून सुरू झालेली यात्रा चेंन्नी फाटा, वाडेगाव येथे दुपारची विश्रांती घेऊन संध्याकाळी वाडेगाव, बाळापूर येथे मुक्कामी पोहोचली.

बुधवारी रात्री मेडशी (वाशीम) येथे तुफान गर्दी झाली होती. तर मेडशी ते पातूर सुमारे १८ किलोमीटरचे  जंगल क्षेत्र वाहनाने पार केल्यानन्तर पातूर येथे मुकाम झाला.

पातूर येथून पहाटे मोठ्या जल्लोषात यात्रेला प्रारंभ झाला. सोलापूर, सांगली, यवतमाळ आणि नागपूर येथील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. दुपारी वाडेगाव मध्ये राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. ज्ञानेश्वर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक आणि देशभक्तीपर गीतांनी राहुलजींचे स्वागत केले. तर भारडे कुटूंबियांच्या इमारतीच्या छतावर अनेक महिला उभ्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी राहुलजी त्यांच्या छतावर गेले. मग त्यांच्या आंनदाला पारा उरला नाही.

वाडेगाव ते बाळापूर दरम्यान दुपारच्या सत्रात बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या जयश्रीताई थोरात पदयात्रेत सहभागी झाले होते. मेधाताई पाटकर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यासह पदयात्रेत चालत होत्या. तर सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते.


Tags: Bharat Jodo YatraCongressMedshirahul gandhi
Previous Post

सूर्यदत्त इन्स्टिटयूट आणि झायरोपॅथी-नेचर क्युअर आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

Next Post

संबळच्या तालावर आदिवाशींसोबत राहुल गांधींनी धरला ठेका…

Next Post
rahul Gandhi Bharat jodo Yatra

संबळच्या तालावर आदिवाशींसोबत राहुल गांधींनी धरला ठेका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!