Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊत यांच्या विरोधात मेधा किरीट सोमय्यांचा मानहानीचा खटला

May 19, 2022
in घडलं-बिघडलं
0
Medha Kirit Somaiya's defamation suit against Sanjay Raut

मुक्तपीठ टीम

“शिवसेना नेते संजय राउत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी १०० कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप करीत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.” अशी याचिका/खटला प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी आज शिवडी, मुंबई कोर्टात दाखल केला.

भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० च्या अंतर्गत संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट २५ नं. न्यायालय येथे प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी केली आहे.

  • गेले अनेक आठवडे संजय राउत यांनी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला आहे, १०० कोटी रुपयांचा अपहार केला आहे असे सातत्याने वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमांसमोर सांगत आहेत.
  • प्रा. डॉ. मेधा सोमैया व युवक प्रतिष्ठान यांनी मिळून अश्या प्रकारची फसवणूक केली असून त्यांची लवकर अटक होणार अशा प्रकाराचे ही विधान अनेक वेळा करण्यात आले.
  • प्रा. डॉ. मेधा सोमैया यांच्या विरोधात पोलीस दखल घेत असून आर्थिक गुन्हे विभागाद्वारा एफआयआर होत आहे. त्याच बरोबर मँग्रोव्ह विभाग पर्यावरण खात्यातर्फे ही चौकशी चालू असून कारवाई करण्यात येत आहे असेही भाष्य संजय राउत यांनी केले.
  • डॉ. मेधा सोमैया, युवक प्रतिष्ठान यांनी कोणताही घोटाळा केला नसून १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असे प्रतिपादन या याचिकेत करण्यात आले आहे.
  • भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांना बदनाम करून भितीचे वातावरण सोमैया परिवारामध्ये उभे करणे हाच संजय राउत व शिवसेनेचा हेतू असल्याची तक्रार आहे.
  • अश्याच पद्धतीने संजय राउत यांनी २०१६ मध्ये प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी ११८ कोटींचा एसआरए (SRA) घोटाळा केला असल्याची बोंबाबोंब व अपप्रचार केला होता. त्यावेळी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कानथावाला यांनी संजय राउत व सामना वर्तमानपत्रावर त्या/या पुढे कोणतीही बदनामी करण्याचे विधान करू नये अश्या प्रकाराची ताकीद सुद्धा दिली होती.

प्रा. डॉ. मेधा सोमैया समवेत डॉ. किरीट सोमैया यांनी आज शिवडी न्यायालयात हा खटला दाखल केला असून पुढच्या आठवड्यापासून याची सुनावणी सुरु होईल असा विश्वास ही व्यक्त केला आहे.


Tags: Defamation CaseKirit SomaiyaMedha Kirit Somaiyamumbaisanjay rautSewreeकिरीट सोमय्यामानहानीचा खटलामेधा किरीट सोमय्यासंजय राऊत
Previous Post

बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने मिळणार घरे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक, ८८ कोटींची खोटी बिलं!

Next Post
Fake GST Invoice

जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक, ८८ कोटींची खोटी बिलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!