मुक्तपीठ टीम
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. गोवर या आजारामुळे सोमवारी आणखी एका लहान मुलाचा मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात झाला. यामुळे एकूण मृतांचा आकडा ४ इतका झाला आहे. मुंबईतमधील ९०८ संशयित रुग्णांपैकी ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ लहान मुलं ही आयसीयूमध्ये आहेत. मुंबईत गोवरची साथ आल्याने कस्तुरबा रुग्णालय कोरोनानंतर पुन्हा लढ्यास सज्ज झाले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात गोवरच्या रुग्णांसाठी ३ वॉर्ड सुरू करण्यात आले असून अनेक सुविधा करण्यात आले आहेत.
आयसीयुमध्ये ५ रुग्ण!!
- मुंबईत आढळून आलेल्या ९०८ संशयित रुग्णांपैकी ६१ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
- सोमवारी ६ रुग्ण आयसीयुमध्ये होते.
- त्यापैकी मंगळवारी सकाळी २ जणांना आयसीयुमधून सामान्य वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- मात्र मंगळवारी दुपारी एका बालकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- यामुळे आयसीयुमधील रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
- त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.
- हे सर्व रुग्ण ६ वर्षाखालील आहेत.
कस्तुरबा रुग्णालयात चांगली सुविधा!!
- कस्तुरबा रुग्णालयात आयसीयुमध्ये चांगली सुविधा आणि स्वच्छ्ता आहे.
- खासगी रुग्णालयापेक्षा चांगली सुविधा या ठिकाणी दिली जाते.
- कस्तुरबा रुग्णालयात गोवरच्या रुग्णांसाठी ३ वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.
- या ३ वार्डमध्ये ११० बेड्स आहेत.
- आयसीयुमध्ये १० यु बेडस असून ५ व्हेंटिलेटर आहेत.
- सध्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास अधिक वॉर्ड सुरू करून बेडसची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.