Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवर साथ: काय आहे, कसा होतो आजार आणि कशी घ्यावी काळजी?

November 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
measles

मुक्तपीठ टीम

सध्या मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मुंबईत ६१ गोवरचे सक्रिय रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा ४ इतका झाला आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. त्यामुळे मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पथकं तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान गोवर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आणि लहान मुलांना हा आजार होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया…

​गोवर रोग काय आहे?

  • गोवर हा विषाणूद्वाके वेगाने पसरणारा संसर्ग आहे.
  • या आजारास इंग्लिश मध्ये मिजल्स किंवा रुबीयोला असे म्हटले जाते.
  • गोवर हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांमध्ये आढळतो.
  • खोकला आणि शिंका यातून गोवरचे विषाणू हवेत पसरतात.
  • हा विषाणू प्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो आणि नंतर खोकला किंवा सर्दी किंवा थेट स्पर्शाने निरोगी लोकांना संक्रमित करतो.

​गोवरची लक्षणे-

  • सुरुवातीला १०४ अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला आणि सर्दी होते.
  • डोळ्याची जळजळ, लाल होणे किंवा पाणीदार डोळे
  • २ ते ३ दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात.
  • त्याच वेळी, ३ ते ५ दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात.
  • गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानांवर, खोडावर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकते.
  • रुग्णाला भूक न लागणे, थकवा जाणवणे, हात पाय दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात.

गोवर झाल्यास काय उपचार करावे?

  • मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे २ डोस दिले जातात.
  • पुरेसा आराम करावा.
  • संक्रमितांपासून दूर रहावे.
  • पाणी आणि ज्यूस प्यावे.
  • मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करावे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावी.
  • बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.

Tags: measlesmumbaiगोवरमुंबई
Previous Post

मच्छिमारांच्या १२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही मिळणार करमुक्त डिझेल कोटा

Next Post

Twitter, Facebook Meta, Microsoft आणि आता Amazonही! कर्मचारी कपात का?

Next Post
tech companies

Twitter, Facebook Meta, Microsoft आणि आता Amazonही! कर्मचारी कपात का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!