मुक्तपीठ टीम
मध्य मुंबईतील करी राड रेल्वे स्थानकाजवळच्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. आग अत्यंत भीषण असून अग्निशमन दलाच्या १६ गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत आहेत.
- १९ व्या मजल्यावर आग लागली आहे.
- २५ व्या मजल्यापर्यंत आग पोहोचली आहे.
- आग विझवण्याचा अग्निशमन दला प्रयत्न करत आहेत. मध्यभागी आग -लागल्यामुळे वरच्या आणि खालच्या मजल्यावर ही आग पोहचू शकते.
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी उपस्थित आहेत.
- जीव वाचवण्यासाठी २१ व्या मजल्यावरुन एक व्यक्ती उडी मारली.
- काही जण जखमी झाले आहेत.
- आग विझवण्यात मोठ्या अडचणी येत आहे, पाण्याचा प्रवाह १९ व्या मजल्यावर पोहचत नाही.
- आग लागण्याचे कारण अजुन समोर आले नाही.
- अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला
दाटीवाटीच्या चाळींमध्ये उभारलेली गगनचुंबी इमारत
- वन अविघ्न ही इमारत ६० मजल्याची आहे. आजूबाजूला बैठी घरं, चाळीही, लहान-मोठ्या इमारती अशी दाटीवाटीची वस्ती आहे.
रस्तेही अरुंद आहेत. - त्यामुळे अग्निशमन दलासाठी आगीशी झुंज देणे सोपे नाही.
- त्यात आजच्या आगीमुळे इमारतीतील अग्निप्रतिबंधक व्यवस्थाही व्यवस्थित नसल्याचा आरोप होत आहे.
आगीमुळे अनेक रहिवाशी अडकले, एक जीव वाचवताना कोसळला!
- अनेक नागरिक अडकले आहेत.
- २१ व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून सुटकेचा प्रयत्न केला.
- जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. ती व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
- आग ५ व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. इमारतीचा रस्ता अगदी छोटा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांना सामना करावा लागत आहे.
- अग्निशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.