मुक्तपीठ टीम
प्रत्येकाला एक अनोखा छंद असतो, त्या छंदानुसार त्यांची ओळख बनते. असाच एक छंद आहे प्रमोद कांबळे या शिल्पकाराचा. तो आहे देश-विदेशातील मग जमवण्याचा. त्यांनी संग्रह केला आहे तो वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन इंचापासून ते २० लिटर क्षमता असलेल्या मगांचा. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार – शिल्पकार अशी ओळख असलेले प्रमोद कांबळे यांनी आपल्या छंदातून उभारलेले,‘मग’ संग्रहालय नुकतंच पाहण्यासाठी खुलं करण्यात आले आहे.
असं उभारलं मगाचं संग्रहालय
- काही वर्षांपूर्वी मुंबईला जगप्रसिद्ध कलाकार पाब्लो पिकासो यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिल्पकार कांबळे आले होते.
- तिथे पिकासोची स्वाक्षरी असलेले ‘मग’ विक्रीसाठी ठेवले होते.
- पिकासोची आठवण म्हणून मी त्यांनी ‘मग’ विकत घेतला.
- काळाघोडा फेस्टिव्हल दरम्यान सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीचा स्टॉलमध्ये कॅलिग्राफीचे १० ही ‘मग’ विकत घेतले.
- त्यानंतर असेच विविध आकारातील मग घेण्याचा छंद त्यांना जडला.
- देश – विदेशात कुठेही प्रवासाला गेले की ते आवर्जून मग खरेदी करतात.
- या छदामधूनच हे संग्रहालय साकारले आहे.
- त्यांचे मित्रही कुठे वेगळे ‘मग’ दिसले की त्यांच्यासाठी ते घेऊन येतात.
- जवळपास अडीच हजार मगांचा ठेवा स्वतंत्र संग्रहालय त्यांनी तयार केला आहे.
कसं अनोखं आहे हे संग्रहालय?
- जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण एक एम. एम. ते २० लिटर क्षमता असलेले अडीच हजार मग संग्रहालयात आहेत.
- धातु , सिरॅमिक, काच, टेराकोटा, पत्रा, कागद अशा विविध माध्यमातील आकार, रंग रुपाचे मग या संग्रहायलात आहेत.
- संगीत, नाट्य, कला, ज्ञान, विज्ञान आदी विषय या कपातून साकारण्यात आले आहेत .
- विविध आकार, विविध मान्यवरांच्या स्वाक्षरी आणि गतकाळापासून ते आधुनिक युगापर्यंतचे मग या संग्राहायलयात बघायला मिळणार आहेत .
या संग्रहालयाचे उद्घाटन थाटात झाले. त्यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील , डॉ . रवींद साताळकर उपस्थित होते. स्वाती प्रमोद कांबळे यांनी स्वागत केले. मोना शुभकर कांबळे यांनी आभार मानले. शहरातील गुलमोहर रस्त्यावर असलेल्या कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये हे ‘मग’चा संग्रहालय भारतातील कदाचित पहिलेच दालन असावे, असा दावा कांबळे यांनी केला.