Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसरा आठवड्यातही टीव्ही 9 अव्वल!

July 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसरा आठवड्यातही टीव्ही 9 अव्वल!

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी प्रेक्षकांना भावणारं राजकारण कव्हर करण्यात आता आपणच अव्वल असल्याचं टीव्ही9 मराठीनं पुन्हा दाखवून दिलं. सत्तानाट्य सुरु होताच आपलं गमावलेलं नंबर १चं स्थान पुन्हा मिळवणाऱ्या या चॅनलने याही आठवड्यात २९.४ मार्केट शेअरसह आपलं स्थान कायम राखलं आहे. इतर तीन मराठी न्यूज चॅनल्सच्या स्थानांमध्ये फार फरक झालेला नाही. न्यूज १८ लोकमतने मात्र ०.३ची वाढ नोंदवली आहे. लोकशाहीचं बार्क रेटिंग सध्या बंद आहे.

या वर्षाच्या २७व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये ०.१ टक्क्याची वाढ नोंदवत २९.४ टक्के मार्केट शेअरसह टीव्ही 9 मराठी नंबर १ आहे, दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासचा मार्केट शेअर २५.८वरच आहे. एबीपी माझा ०.२ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर आहे, साम १२.३ टक्क्यांसह चौथ्या आणि न्यूज 18 लोकमत ०.३ ची वाढ नोंदवत ११ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.

कोणाचा किती वाटा, कोणाला किती घाटा?

पहिल्या क्रमांकावरील टीव्ही9ची कामगिरी पुन्हा चांगली होत आहे. यावेळी फक्त ०.१टक्काच वाढ नोंदवली असली तरी राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्ये गेली अनेक वर्षे पुढे असणाऱ्या एबीपी माझाशी तुलना करता सत्तासंघर्षाच्या घडामोडींच्या काळात टीव्ही 9 नंबर १ असणं उल्लेखनीय आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासने या आठवड्या जास्त काही गमावलेलं नाही, पण कमावलेलंही नाही.

तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची कामगिरी सतत ४ आठवडे सुधारली, मात्र सत्तासंघर्षाच्या या दुसऱ्या आठवड्यात मात्र त्यांना ०.२ने मागे जावे लागले. त्यांचा मार्केट शेअर तिसऱ्या क्रमांकावर २१.६चा आहे.

चौथ्या क्रमांकावरील सामने १२.३ मार्केट शेअर कायम राखला आहे. मात्र, पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमतची मंद अशी वाढ त्यांच्यासाठी चिंताजनक आहे.

या आठवड्यात ०.३ने किंचित पुढे जात लोकमत ११टक्क्यांवर पोहचला आहे. काही आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी केली तर चौथ्या क्रमांकावर पोहचणे अशक्य नसणार.

सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही. ते पुढील आठवड्यानंतर सुरु होण्याची शक्यता आहे.

(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:

टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?


Tags: टीव्ही रेटिंगमराठी न्यूज चॅनल्समराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग
Previous Post

दुसऱ्यांदा देशात महिला राष्ट्रपतींची शक्यता, पण ५० टक्के महिलांमधून देशभरात फक्त १० टक्के आमदार-खासदार!

Next Post

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे ८ निर्णय! जाणून घ्या विस्तारानं…

Next Post
Cabinet DEcision

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे ८ निर्णय! जाणून घ्या विस्तारानं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!