तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
गेले १६ आठवडे पहिल्या क्रमांकावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही 9 मराठीचं पहिल्या क्रमांकांचं स्थान धोक्यात आल्याचं आता तरी दिसत आहे. गेले काही आठवडे सतत घसरणारा टीव्ही9 मराठीचा मार्केट शेअर सतत घसरत आहे. त्याचवेळी झी २४ तासचा मार्केट शेअर पुन्हा वाढत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील चॅनल्समधील अंतर या आठवड्यात अवघ्या ०.५ टक्क्यावर आलं आहे. एबीपी माझा पुन्हा किंचित मागे गेला आहे. तर चौथ्या क्रमांकावरील सामने किंचित वाढ नोंदवली आहे. न्यूज १८ लोकमतने प्रगती कायम राखत पाचव्या क्रमांकावरच पण दहा टक्के मार्केट शेअरचा आकडा पार केला आहे. सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीचा मार्केट शेअर सतत खाली जात असून या आठवड्यात पाचच्याही खाली गेला आहे.
काय घडू – बिघडू शकते?
- प्रस्थापित चॅनल्सनी बार्कच्या रेटिंग पुनर्रचने दरम्यान चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगला स्वीकारणं सध्या त्यांनाच भारी पडलं आहे.
- त्यामुळे आता कोणतेही दुसरे चॅनल झटकन वरील क्रमांकावर झेपावू शकत नाही.
- पण सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर बदल घडवणं अशक्य नाही.
- सध्या टीव्ही 9 मराठीच्या पहिल्या स्थानाला आव्हान देणारे झी २४ तास चॅनलची कामगिरी तेच दाखवत आहे.
- चांगल्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तास आणि मोठ्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझा या एकेकाळच्या टीआरपीचा राजा चॅनलपासून अंतर राखून असणाऱ्या टीव्ही ९मराठीचे अढळस्थान आता धोक्यात असल्याचे दिसत आहे.
- सातत्यपूर्ण मार्केट शेअरमध्ये वाढ नोंदवणारे झी २४ तास आता टीव्ही 9मराठीच्या पहिल्या क्रमांकापासून फक्त अर्ध्या टक्क्यानं दूर आहे.
- टीव्ही 9च्या टीमने पुढील तीन दिवसात भरपूर जोर लावला तर त्यांचं पहिलं स्थान कायम राहू शकेल.
- मात्र, झी २४ तासचं वाढीतील सातत्य जास्त जोर लावल्यास जर जास्त वाढीत बदललं तर पुढील आठवड्यात मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये बदल होणे अशक्य नाही.
टीव्ही रेटिंगमधील महत्वाचे पॉईंट्स…
- हा या वर्षातील रेटिंगचा २१ वा आठवडा आहे.
- पण न्यूज चॅनलचे स्थगित असलेले रेटिंग सुरु झाल्यानंतरचा हा १६वा आठवडा आहे.
- या आठवड्यातही चॅनल्सच्या मार्केट शेअरमधील स्थानांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
- मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठीच पहिल्या स्थानी आहे. पण मार्केट शेअर .२ने कमी झाला आहे.
- झी २४ तास हे चॅनल या आठवड्यात ०.२ पुढे गेलं आहे.
- एबीपी माझा ०.२ ने मागे गेले आहे.
- साम या आठवड्यात ०.२ने पुढे गेले आहे.
- न्यूज 18 लोकमत याही आठवड्यातही .४ ने वाढले आहे.
- लोकशाही सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांचा मार्केट शेअर याही आठवड्यात ०.३ने कमी झाला आहे.
कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?
- मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २७.४% मार्केट शेअरसह टीव्ही9 मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ आहे. त्यांच्यात ०.२ ची घट आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर २६.९% मार्केट शेअरसह झी २४ तास आहे.०.२ची वाढ आहे. वाढीत सातत्य आहे.
- एबीपी माझा १९.१ % मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.त्यांच्यात ०.२ची घट आहे.
- साम टीव्हीने ०.२ची वाढ झाली असून ११.७% मार्केट शेअरसह चौथ्या क्रमांकावर आहे.
- पाचव्या क्रमांकावर १०.१% मार्केट शेअरसह न्यूज १८ लोकमत आहे. त्यांच्यात ०.४ची वाढ आहे. वाढीत सातत्य आहे.
- सहाव्या क्रमांकावर ४.८ % मार्केट शेअरसह लोकशाही आहे.
(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)
समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…
- मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
- एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
- झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
- सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
- या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
- ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
- याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
- चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
- या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)