Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल टीआरपी रिपोर्ट: टीव्ही 9 मराठी पुन्हा नंबर १च्या अगदी जवळ! झी २४ तासशी अटीतटीची स्पर्धा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TV Rating Week 20

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी न्यूज चॅनल्सच्या पहिल्या क्रमांकासाठीची स्पर्धा आता खूपच अटीतटीची झाली आहे. बार्कचे रेटिंग सुरु झाल्यापासून जास्तीत जास्त आठवडे नंबर १ असलेला टीव्ही 9 मराठी पहिल्या क्रमांकावर पोहचल्यासारखंच घडलं आहे. काही आठवडे टीव्ही9 मराठीला मागे टाकणारा झी २४ तास या आठवड्यात क्रमांक १वर असला तरी त्यांचे ते स्थान फक्त ०.१ने मार्केट शेअर जास्त असल्यामुळे आहे. पुढच्या आठवड्यात २४तासला मागे टाकत टीव्ही 9 मराठी क्रमांक एकवर विराजमान झाला तर आश्चर्य वाटायला नको!

सध्या बार्कच्या पद्धतीनुसार रेटिंग हे चार आठवड्यांची सरासरी काढून ठरवलं जातं. याचा अर्थ टीव्ही 9 मराठीने या आठवड्यात चांगली कामगिरी बजावली असणार त्यामुळे ३३व्या आठवड्यात ०.६वर असलेले दोन्ही चॅनलमधील अंतर फक्त ०.१वर आले आहे. त्यामुळे एकप्रकारे टीव्ही 9 मराठी मराठी न्यूज चॅनलमध्ये नंबर १ झाल्यात जमा आहे. आता फक्त पुढच्या आठवड्यातील रेटिंगमध्ये तशा अधिकृत घोषणेची वाट पाहिली जाईल. अर्थात त्यासाठी टीव्ही ९ मराठीचा मार्केट शेअर या ३५ व्या आठवड्यातही चांगला असावा लागेल. तसेच झी २४ तासने असाधारण अशी कामगिरी बजावत या आठवड्यात जबरदस्त अंतर वाढवलं तर ते पहिला क्रमांक टिकवू शकतील. पण तसं करणं सोपं नाही.

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम (आठवडा ३४वा )

१ – झी २४ तास २५.५%
२ – टीव्ही ९ मराठी २५.४%
३ – एबीपी माझा १८.२%
४ – साम १३.२%
५ – न्यूज १८ लोकमत ११.७%
६ – लोकशाही ०६%

मराठी न्यूज चॅनल्स मार्केटमधील नंबर गेम

आठवडा ३४ ३३ ३२ ३१
झी २४ तास २५.५ २६.० २६.५ २६.८
टीव्ही ९ मराठी २५.४ २५.६ २५.३ २५.३
एबीपी माझा १८.२ १८.३ १८.६ १८.८
साम १३.२ १२.९ १२.९ १२.६
न्युज १८ लोकमत ११.७ ११.५ ११.२ ११.२
लोकशाही ०.६ ०५.७ ०५.५ ०५.३

मराठी न्यूज चॅनल्सच्या मार्केटमध्ये काय घडलं, काय बिघडलं?

  • या वर्षाच्या ३४व्या आठवड्यात झी २४तासच्या मार्केट शेअरमध्ये ०.५ टक्क्याची घट झाल्यानंतरही २५.५ टक्के मार्केट शेअरसह झी २४ तास नंबर १ आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावरील टीव्ही ९ मराठीचा मार्केट शेअर ०.२ने घटून २५.४वर पोहचला आहे. त्यामुळे टीव्ही9मराठी २४ तासला अगदी खेटून आहे. आपला गमावलेला पहिला क्रमांक मिळवण्यासाठी आणखी फक्त ०.१ चा फरक ओलांडावा लागणार आहे.
  • एबीपी माझा ०.१ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर १८.२ टक्क्यांसह आहे.
  • साम ०.३ ची वाढ नोंदवत नोंदवत १३.२ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
  • न्यूज 18 लोकमत ०.२ ची वाढ नोंदवत ११.७ % मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
  • सहाव्या क्रमांकावरील लोकशाही ०.३ची वाढ नोंदवत ०६ % मार्केट शेअरसह सहाव्या क्रमांकावर आहे.

खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु.

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
  • झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के
  • अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असत नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

Tulsidas Bhoite

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:
टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?


Tags: Marathi News ChannelMarathi News Channel TRP ReportTrp reportTV 9 MarathiZee 24 Taasझी २४ तासटीआरपी रिपोर्टटीव्ही ९ मराठीमराठी न्यूज चॅनलमराठी न्यूज चॅनल टीआरपी रिपोर्ट
Previous Post

अमेरिकेन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Next Post

राज्यात १२५८ नवे रुग्ण, १९४२ बरे! मुंबई ४०२, नाशिक १८, नागपूर ७ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात १२५८ नवे रुग्ण, १९४२ बरे! मुंबई ४०२, नाशिक १८, नागपूर ७ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!