मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होत. त्यामुळे यंदाचं ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आडगाव येथे होणार आहे. दरम्यान संमेलनाच्या उद्घाटकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्धाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.
भुजबळांनी दिली ही माहिती
- या संमेलनाच्या उद्घाटनाठी कादंबरीकार विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे.
- समारोपाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.
- साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम महापौर सतीश कुलकर्णी आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला.
- या कार्यक्रमानंतर भुजबळांनी ही माहिती दिली.
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
- याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्धीचा अधिक जागर करू, असेही ते म्हणाले.
असा असेल कार्यक्रम
- ३ ते ५ डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे.
- खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
- त्यामुळे विज्ञानवादी साहित्य संमेलन या संमेलनाचा पाया आहे.
- बालसाहित्य, कवीकट्टा, कथाकथन, ग्रंथ दिंडी, असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत.
- राजसत्ताचा निर्दयीपणा, मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, कोरोनानंतरचे अर्थकारण मराठी साहित्य व्यवहार, ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड, गोदतीराच्या सतांचे योगदान, नाशिक जिल्ह्याला १५१ वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्ह्याचा जागर अशा परिसंवादाची मेजवानी या साहित्य संमेलनात अनुभवायला मिळणार आहे.