Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२४ तासात ३९.६९ किमी रस्ताबांधणी विक्रमासाठी मराठी उद्योजकाचा दुबईत सन्मान

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
मराठी उद्योजक

मुक्तपीठ टीम

आशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरमतर्फे पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉनचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांचा ‘ग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर’ पुरस्काराने दुबईत सन्मान करण्यात आला. राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यात २४ तासांत ३९.६९ किमीचा रस्ता बांधल्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे. दुबईतील बिझनेस मीडिया हाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०२०-२१ साठीचा ‘ग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर’ हा पुरस्कार कदम यांना श्रीलंकेचे राजदूत मालराज डिसिल्व्हा, संयुक्त अरब अमिरातीतील सामाजिक विकास मंत्रालयाच्या अमल अलब्लुशी, मोल्दोवा प्रजासत्ताकचे राजदूत व्हिक्टर हारुता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मे महिन्यात साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान ३९.६९ किलोमीटरचा रस्ता २४ तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित करत महाराष्ट्राच्या एकसष्टी निमित्त अनोख्या अनोख्या स्वरूपात अभिवादन केले होते. ‘राजपथ इन्फ्राकॉन’च्या विश्वविक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर संशोधन, छाननीनंतर या पुरस्कारासाठी नामांकन केले जाते. आघाडीच्या ज्युरींकडून तावून सुलाखून निवड प्रक्रिया राबविण्यात येते.

 

या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत जगदीश कदम म्हणाले, “पायाभूत सुविधा क्षेत्रातील विकासासाठी काम करणारी एक संस्था म्हणून राजपथ इन्फ्राकॉनची ओळख आहे. करोना काळातील लॉकडाउनसह विविध अडचणी आणि आव्हानांचा सामना करून ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने हा रस्ता तयार केला. आशिया, मध्य पूर्व आणि अफ्रिकेतील महान व्यक्तींसमवेत हा सन्मान झाला, याचा आनंद आहे. या निमित्ताने आशियाई, मध्य पूर्व आणि अफ्रिकन प्रदेशातील जागतिक दर्जाच्या आणि उद्योगातील सर्वोत्तम संस्थांच्या कामगिरीचेही दर्शन या परिषदेत घडले. उद्योग वाढ आणि शाश्वत विकासासाठी उद्योजकता, उत्कृष्ठता आणि सामुहिक चांगुलपणाची भावना अशा पुरस्कारांमुळे दृढ होते. भविष्यातही आणखी चांगले उपक्रम राबविण्याचा मानस आहे.”

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Asia Africa Business and Social ForumDubaiGreatest Brand & Leader AwardManaging Director Jagdish KadamMarathi EntrepreneurmuktpeethpuneRajpath Infracon Rajpath InfraconRoad Constructionआशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरमग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर पुरस्कारदुबईपुणेमराठी उद्योजकरस्ताबांधणीराजपथ इन्फ्राकॉनव्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम
Previous Post

राज्यात ८४५ नवे रुग्ण, ७३० रुग्ण बरे होऊन घरी! नऊ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही!!

Next Post

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी महाराष्ट्रात आता ७५ आणि ८० टक्के अनुदान!

Next Post
Drip Irrigation

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी महाराष्ट्रात आता ७५ आणि ८० टक्के अनुदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!