मुक्तपीठ टीम
मराठी बिगबॉस सिझन थ्री चा विजेता ठरला देवेखिंडीचा विशाल निकम
‘बिगबॉस’चं तिसरं पर्व दिमाखात जिंकलं आणि विशाल निकमचं गाव जल्लोशानं दणाणलं! हिंदी बिगबॉस नंतर मराठी मध्ये बिगबॉसची लहर आली , आणि तिचे चक्क तीन सिझन प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळे मोठया दिमाखात पार पडले. कालच तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला आणि जेतेपदाची माळ विशाल निकमच्या गळ्यात पडली. जेतेपदाची ट्रॉफी आणि २० लाखाची रक्कम त्याला विनर म्हणून घोषित करण्यात आली आहे. विजयी झाल्यानंतर विशालने सरळ आपल्या गावाची वाट धरली आणि तो सरळ सांगली जिल्ह्यातील देवेखिंडी या गावी परतला. गावाने त्याच जल्लोषात स्वागत केले. लोकांच्या प्रेमामुळेच मी हा किताब जिंकू शकलो असे मत विशालने व्यक्त केलंय , तर लहानपणापासून सर्वाशी प्रेमाने , मिळून मिसळून वागण्याच्या त्याच्या स्वभावामुळे विशाल हे जेतेपद पटकवल्याची भावना त्याचा भाऊ डॉ. अभिजित निकम यांनी व्यक्त केली आहे. Bsc फिजिक्स घेऊन पदवीधर असलेला विशाल एनसीसी सुध्दा झालेला आहे.
पण नंतर तो मनोरंजन क्षेत्राकडे वळला , पण येथेही त्याने अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने दक्खनचा राजा जोतिबा या मालिकेत प्रमुख भूमिका निभावली होती. त्यानंतर तो डायरेक्ट बिगबॉस च्या घरातच पहायला मिळाला. बिगबॉस च्या घरातील इतर तगड्या 5 कलावंतांचे आक्रमण थोपवून लावत शेवटी विशाल निकमने त्यावर आपले नाव कोरले आहे.
‘बिग बॉस’ विशाल निकम!
- विशाल निकम हा सांगली जिल्ह्यातील देविखिंडी गावातील.
- त्याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी तेथेच झाला.
- विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीदेखील आवड आहे.
- विशालचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण ‘मिथुन’ या सिनेमाद्वारे झाले.
- हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
- विशालच्या अभिनयाला दाद मिळू लागली ती छोट्या पडद्यावर.
- ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना भावली.
- ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहचला.
- ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही विशालला चांगल्या भूमिकेत संधी मिळाली.
पाहा व्हिडीओ: