Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरनंतर नाशिकला दुसरे मराठा मुक आंदोलन, १५ आमदारांचा पाठिंबा

June 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
nashik (3)

मुक्तपीठ टीम

नाशिकमध्ये गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकात संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा मूक आंदोलन झालं. सोमवारी सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली होती. कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये दुसरे आंदोलन झाले. या यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह १५ आमदारांनी आंदोलनाला भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी भूमिका मांडली.

 

nashik (2)

 

आंदोलकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्याचे दिसून आले. अनेकांनी काळ्या रंगाची वेशभूषा केली होती. आंदोलनस्थळी मराठा मूक आंदोलनाचे समन्वयकही सहभागी झाले होते.

 

nashik (1)

 

“आपण इथं आलात, आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. नाशिकच्या पुण्य नगरीतून मी सांगू इच्छितो की, मी फक्त मराठ्यांचं नेतृत्व करत नाही आहे, मी मराठा समाजाच्या माध्यमातून एक निमित्त आहे, शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका एकत्र कशी आणता येईल, हा माझा दृष्टीकोन आहे. संपूर्ण बहुजन समाजच कसा एकत्र राहू शकतो, हा माझा दृष्टीकोन आहे”, असे संभाजीराजेंनी म्हटले.

नाशिकमधील संभाजी छत्रपतींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे.
  • पुनर्विचार याचिका हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल.
  • या आयोगाच्या माध्यमातून राज्यपाल, तिथून केंद्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत असाच पर्याय आहेत.
  • राज्य सरकारच्या हातात असलेल्या आमच्या मागण्यांची पूर्तता राज्य सरकारने करावी.

 

“कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन हे सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे”, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.


Tags: Maratha Reservationnashiksambhaji chhatrapatiनाशिकमराठा मूक आंदोलनसंभाजी छत्रपती
Previous Post

शिवसेना- भाजप युतीच्या प्रताप सरनाईकांच्या भूमिकेचे आरपीआयकडून स्वागत

Next Post

मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत, आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज – छगन भुजबळ

Next Post
chhagan bhujbal (1)

मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत, आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज - छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!