मुक्तपीठ टीम
मिस्टर इंडियाचा गतविजेता बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बॉलिवूडमधील छळवणुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या मनोज पाटील याच्या प्रकृतीत सुधारण दिसत आहे. त्याने गोळ्या खाण्यापूर्वी लिहिलेल्या अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर या प्रकरणी साहिलविरोधात भावना व्यक्त होत आहे. केवळ थातूरमातूर कारवाई करण्यावर भागवू नये, तर साहिलला अद्दल घडेल, असा धडा शिकवण्याची मागणी जोर धरत आहे.
अभिनेता साहिल खानवर मनोज पाटीलचे गंभीर आरोप
- मनोज पाटीलने झोपण्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
- सुसाईड नोटमध्ये मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गेल्या अनेक दिवसांपासून त्याला त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
- मनोजच्या आरोपांनुसार, साहिल खानने सोशल मीडियावर त्याच्याविरोधात दिशाभूल करणारी माहिती आणि व्हिडीओ प्रसारित केले आहेत.
- त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, छळ आणि बदनामी केल्यामुळे तो आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.
मिस्टर ऑलिम्पियाचा वाद आहे तरी काय?
- मिस्टर इंडिया असलेला मनोज पाटील मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता.
- साहिल खानलाही या स्पर्धेत भाग घ्यायचा होता.
- मनोज पाटीलच्या आरोपानुसार, स्पर्धेच्या कारणामुळे साहिल खान त्याची बदनामी करण्याचा सतत प्रयत्न करत होता.
- त्याचे अमेरिकेत खेळण्यासाठी जाण्याचे तिकीटही रद्द करण्यात आले असा कुटुंबीयांनी साहिल खानवर आरोप केला आहे.
- याशिवाय दोघांमध्ये व्यावसायिक वादही झाला होता.
कुटुंबाने साहिल खानविरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान, मनोज पाटील यांच्या कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनोज पाटील यांचे कुटुंब दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची याचना करणार असल्याचेही कळले आहे.