Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘गेल’च्या निविदा प्रक्रियेमध्ये हेराफेरी! दोन कंपन्यांना सीसीआयने दंड ठोठावला!!

October 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Manipulation in Gail's tender process

मुक्तपीठ टीम

गुजरातच्या अहमदाबाद आणि आणंद येथे असलेल्या तेलविहिरींचे कार्य पुन्हा सुरु करण्यासाठी गेल अर्थात गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लि. या सरकारी कंपनीने २०१७-१८ मध्ये सुरु केलेल्या निविदा प्रक्रिमध्ये पूर्वनियोजित पध्दतीने बोली लावून प्रक्रियेत हेराफेरी केल्याबद्दल सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने पीएमपी इन्फ्राटेक प्रा.लि. आणि रती इंजिनियरिंग या दोन कंपन्यांविरुद्ध दंड आणि कारवाईचा अंतिम आदेश जारी केला आहे.

 

महासंचालकांनी केलेला तपास तसेच इलेक्ट्रॉनिक आणि दस्तावेजांचे पुरावे यांसह नोंदणी झालेले इतर पुरावे यांच्या आधारावर सीसीआयला असे दिसून आले की, या दोन कंपन्या गेल कंपनीच्या निविदा प्रक्रियेदरम्यान आणि त्यांनी त्यांच्या निविदा सादर केल्यानंतर देखील एकमेकांच्या सतत संपर्कात होत्या. तसेच, या दोन्ही कंपन्यांच्या निविदा पीएमपी इन्फ्राटेक प्रा.लि. या कंपनीच्या कार्यालयातील एकाच आयपी अॅड्रेसवरून केवळ एका दिवसाच्या अंतराने सादर करण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रीयेसाठी अशा प्रकारची वर्तणूक म्हणजे निविदा प्रक्रियेतील हेराफेरीसह स्पर्धाविरोधी वर्तणुकीला मनाई करणाऱ्या स्पर्धा कायदा २००२ च्या विभाग ३(३) आणि विभाग ३(१) मधील तरतुदींचे उल्लंघन असल्याचे सीसीआयच्या निदर्शनास आले.

 

सीसीआयने या गैरवर्तणुकीसाठी पीएमपी इन्फ्राटेक प्रा.लि या कंपनीला २५ लाख रुपयांचा तर रती इंजिनियरिंग या कंपनीला २.५ लाख रुपयांचा तर कंपन्यांचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणाऱ्या संबंधित कंपन्यांतील व्यक्तींना अनुक्रमे एक लाख आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय, सीसीआयने या कंपन्यांना विद्यमान निविदा प्रक्रियेतून माघार घेण्याचा तसेच पुन्हा या प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा आदेश दिला आहे.


Tags: CCIPMP Infratech Pvt.Rati Engineeringपीएमपी इन्फ्राटेक प्रा.लि.रती इंजिनियरिंगसीसीआय
Previous Post

यूजीसीचा महत्वाचा निर्णय! २०२३पर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ‘पीएचडी’ बंधनकारक नाही!

Next Post

“सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास जोमाने होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा!”

Next Post
narayan rane

“सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास जोमाने होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!