मुक्तपीठ टीम
पोलीस म्हटलं की, खाकी कपडे घालून रुबाबदार माणूस डोळ्यासमोर उभा राहतो. गणपती, दिवाळी असो वा दसरा पोलीस आपल्या कुटुंबासोबत हे सण साजरे न करता नागरिकांच्या रक्षणासाठी ड्यूटीवरच असतात. अशातच जनतेचे सेवक म्हणून काम करीत असताना मंचर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आदिवासी पांड्यावर वंचित गरीब कुटुंबियांना दिवाळी सणाचे फराळ वाटप करून एक अनोखी दिवाळी भेट दिली. गरीबाच्या घरी प्रथम दिवाळी मग आपल्या घरीची दिवाळी या संकल्पनेतून मंचर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
राज्यातील गरीब, आदिवासी पाड्यावर हर घर दिवाळी शेवराई शेवाभावी संस्थेच्या वतीने व मंचर पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक सतिश होडकर यांनी आदिवासी वस्तीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आदिवासी समाजसेवक व साहित्यिक,नामदेव भोसले यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त साडी व कपडे वाटप आणि फराळ वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस बांधवांनी तिथल्या तरुण मंडळींना आणि त्यांच्या पालकांना आपली मुले समाजात शिक्षण घेऊन कशी मोठी होतील याचे महत्व पटवून दिले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक नामदेव भोसले उपस्थीत होते. या वेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडकर,सहाय्यक पोलीस किरण भालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाजीराव कांबळे, शादीपुर भोसले, प्रेम भोसले,स्वप्रित भोसले ,सचिन राऊत,गौरी भोसले यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.