मुक्तपीठ टीम
उत्तराखंडमध्ये असलेले माना गाव आपल्या सांस्कृतिक वारशासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. या गावचा एक रंजक असा इतिहास आहे. उत्तराखंडमधील माना गाव ‘शेवटचे भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाते. उत्तराखंडमधील माना आणि हिमाचल प्रदेशातील चितकुल या दोन गावांमध्ये लोकांना प्रश्न पडतो की, शेवटचं गाव नेमकं कोणतं? चित्कुल हे भारत-तिबेट सीमेवरील शेवटचे वस्ती असलेले गाव आहे, परंतु उत्तराखंडमधील माना अधिकृतपणे ‘भारताचे शेवटचे गाव’ म्हणून ओळखले जाते.
‘माना’ गावचा पौराणिक इतिहास
- भारतात अशी अनेक गावे आहेत, ज्यांच्याशी काही ना काही पौराणिक रहस्य जोडलेले आहे. हे गावही असेच आहे.
- चीनच्या सीमेला लागून असलेल्या पवित्र बद्रीनाथपासून चार किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
- या गावाचा संबंध महाभारत काळाशीही आहे आणि गणपतीशीही आहे. या गावातून पांडव स्वर्गात गेले असे मानले जाते.
- येथूनच पाच पांडवांनी स्वर्गाची शेवटची यात्रा केली.
- माना गावाला हिंदूंसाठी खूप धार्मिक महत्त्व आहे.
- या ठिकाणी सरस्वती नदीजवळ ‘भीमा पुल’ नावाचा एक दगडी पूलही आहे, जो पाच पांडव बंधूंपैकी एक असलेल्या भीमाने बांधला होता, असे म्हणतात.
मिळालेल्या माहितीनुसार, हे भारतातील एकमेव गाव आहे, जे पृथ्वीवरील चारही धामांपैकी सर्वात पवित्र मानले जाते. हे गाव शापमुक्त आणि पापमुक्तही मानले जाते.
माना गाव कुठे आहे?
- उत्तराखंडमधील ३२०० मीटर उंचीवर चमोली जिल्ह्यात वसलेले, माना गाव सरस्वती नदीच्या काठावर वसलेले आहे.
- हे सुंदर गाव भारत-चीन सीमेपासून २४ किमी अंतरावर असून ते भारतातील शेवटचे गाव बनले आहे.
- माना हे गाव सुमारे १९ हजार फूट उंचीवर आहे.
- मणिभद्र देव यांच्या नावावरून या गावाचे नाव ‘माना’ पडल्याचे सांगितले जाते.