Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात मंदिरात स्पिकरवर मोठ्या आवाजात भजन करणाऱ्याची हत्या! मारणारेही हिंदूच!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mehsana Police station Gujarat

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रासह देशात लाऊडस्पीकरचा वाद शिगेला पोहोचला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर उतरवण्यावर राज्य सरकारला ३ मेचा अल्टिमेटम दिला होता. तर उत्तरप्रदेशमध्ये लाऊडस्पीकरवर कारवाई करण्यात आली. मात्र गुजरातमध्ये वेगळचं चित्र दिसून आलं आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एका मंदिरात लाऊडस्पीकरवर जोरात आरती वाजवल्याबद्दल एका तरुणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मारेकरी हे हिंदूच आहेत. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७ वाजता जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात ही घटना घडली. मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. जसवंत यांचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसांना सांगितले की, दोघेही त्यांच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात आरती करत होते. यावेळी लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती. तेवढ्यात सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवनजी ठाकोर, विनुजी ठाकोर आले आणि म्हणाले की तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवत आहात? आम्ही आरती करतो, असे अजितने सांगितले, त्यानंतर सदाजीने शिवीगाळ सुरू केली.यावर आक्षेप घेत सदाजीने सहकाऱ्यांना बोलावून घेतले. सर्वांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात जसवंत आणि अजित गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत गावातील लोकांनी त्याला मेहसाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे जसवंतचा मृत्यू झाला. अजितच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजितवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी २ मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला तालुक्यात एका मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल ३० वर्षीय भरत राठोडला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आरोपी आणि पीडित हिंदू समाजातील दोन भिन्न जातींचे होते.


Tags: GujaratLanghnaj Police StationloudspeakerMehsanaगुजरातमेहसाणालंघनाज पोलिस ठाणेस्पिकर
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता सभा

Next Post

मोदींचा जर्मनीतील मराठी मुलाशी संवाद, टर उडवणं कुणाल कामराला महाग पडणार!

Next Post
PM Modi Talking to Marathi Boy In Berlin

मोदींचा जर्मनीतील मराठी मुलाशी संवाद, टर उडवणं कुणाल कामराला महाग पडणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!