Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगाल जिंकले, ममतांची नजर आता दिल्लीवर!

शहीद दिन भाषणाच्या देशभरातील अनेक शहरांमध्ये मोठ्या स्क्रिनवर प्रक्षेपणाने मोहिमेची सुरुवात

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata banerjee

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी आता यांनी आपली नजर दिल्लीरृकडे वळवली आहे. केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या आणि सरकार पाडापाडीचा खेळ खेळलेल्या ममतांना राष्ट्रीय राजकारणानं खुणावलं नसतं तरच आश्चर्यच होतं. सध्या त्या पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याच्या रणनीती बनवत आहेत.

“जिसे देश चाहता है”…या मोहिमेचा एक भाग म्हणून ममता बॅनर्जी कोलकाता येथे आयोजित परंपरागत शहीद दिन कार्यक्रमाला उपयोगात आणलं. ममतांनी तेथे व्हर्चुअल संवाद साधला, तो देशातील प्रमुख शहरांमध्ये तो स्थानिक भाषेतील अनुवादासह मोठ्या स्क्रिनवर दाखवण्याची व्यवस्था केली गेली होती. आज त्यांनी भाजपावर हल्ला चढवताना पेगॅसस गुप्तहेरीचा मुद्दा वापरत देशात कोणाशी बोलावं, काय बोलावं यावरही बंधनं आणली गेल्याचा उल्लेख केला.

 

२१ जुलैच्या शहीद दिवसाची परंपरा

  • १९९३मध्ये मे २१ जुलै रोजी कोलकाता येथे युवा कॉंग्रेसच्या निदर्शनादरम्यान पोलिस गोळीबारात १३ कार्यकर्ते ठार झाले.
  • या निदर्शनाचे नेतृत्व ममता बॅनर्जी करीत होत्या.
  • त्यानंतर ममता बॅनर्जींनी आधी काँग्रेसमध्ये नंतर तृणमूल कॉंग्रेसद्वारे हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
  • दरवर्षी २१ जुलै रोजी तृणमूल काँग्रेस तर्फे या दिवशी मोठ्या रॅलीचे आयोजन केले जाते.
  • गेल्या वर्षी या दिवशी ममतांनी आपल्या कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
  • याही वेळी शहीद दिवसाला ममता बॅनर्जी यांनी व्हर्च्युअली संबोधित केले.
  • मात्र, यावेळी त्यांचे भाषण विविध शहरांमध्ये मोठ्या स्क्रीनवर स्थानिक भाषांमध्ये दाखविण्यात आले.
  • दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा आणि इतर ठिकाणी ममतांच्या भाषणाचे स्थानिक भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवण्यात आले.

मिशन २०२४…दिल्लीत ममता सरकार!

  • तृणमूल काँग्रेसने २१ जुलैच्या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.
  • यासाठी त्रिपुरा, आसाम, ओडिसा, बिहार, पंजाब, उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्ये मोठ्या स्क्रिन बसविल्या होत्या.
  • २०२४ मध्ये दिल्लीत ममता सरकार, या टॅगलाइनसह राष्ट्रीय राजकारणात सक्रियता वाढवली जाईल.
  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेश हा सर्वात मोठा घटक असणारच.
  • त्यामुळे पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी दावा केला आहे की, उत्तरप्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभवासाठी सर्व प्रयत्न केले जातील.

बंगाल जिंकल्यानंतर इतर राज्यांकडे लक्ष

  • तृणमूलचे सरचिटणीस बनल्यानंतर ममतांचे राजकीय वारसादर अभिषेक बॅनर्जी यांनी केवळ बंगालमध्येच नव्हे तर अन्य राज्यातही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
  • यापूर्वीही तृणमूलने केरळ आणि गुजरातमध्ये निवडणूक लढविली होती, परंतु फारसा परिणाम होऊ शकला नाही.
  • ईशान्येकडील मणिपूर, अरुणाचल आणि त्रिपुरामध्ये पक्षाने जोर धरला पण तो टिकवता आला नाही.
  • मात्र, आता देशाचा मूड बदलला असल्याने ममतांच्या नेतृत्वाला प्रतिसाद वाढेल असे तृणमूलच्या नेत्यांना वाटते.

Tags: Mamata BanerjeeTMCतृणमूल काँग्रेसममता बॅनर्जीव्हर्चुअल रॅलीशहीद दिन कार्यक्रम
Previous Post

मायावतींचे ‘मिशन ब्राह्मण’, पुन्हा भाजपावर नाराज ब्राह्मणांच्या मदतीनं सत्तेचा प्रयत्न

Next Post

सिद्धार्थ चांदेकर – मिताली मयेकर जोडीची ‘हौस हजबंड’ कथा स्टोरीटेल मराठीवर!

Next Post
storytel

सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर जोडीची 'हौस हजबंड' कथा स्टोरीटेल मराठीवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!