मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी आता यांनी आपली नजर दिल्लीरृकडे वळवली आहे. केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या आणि सरकार पाडापाडीचा खेळ खेळलेल्या ममतांना राष्ट्रीय राजकारणानं खुणावलं नसतं तरच आश्चर्यच होतं. सध्या त्या पुढील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याच्या रणनीती बनवत आहेत.
“जिसे देश चाहता है”…या मोहिमेचा एक भाग म्हणून ममता बॅनर्जी कोलकाता येथे आयोजित परंपरागत शहीद दिन कार्यक्रमाला उपयोगात आणलं. ममतांनी तेथे व्हर्चुअल संवाद साधला, तो देशातील प्रमुख शहरांमध्ये तो स्थानिक भाषेतील अनुवादासह मोठ्या स्क्रिनवर दाखवण्याची व्यवस्था केली गेली होती. आज त्यांनी भाजपावर हल्ला चढवताना पेगॅसस गुप्तहेरीचा मुद्दा वापरत देशात कोणाशी बोलावं, काय बोलावं यावरही बंधनं आणली गेल्याचा उल्लेख केला.
२१ जुलैच्या शहीद दिवसाची परंपरा
- १९९३मध्ये मे २१ जुलै रोजी कोलकाता येथे युवा कॉंग्रेसच्या निदर्शनादरम्यान पोलिस गोळीबारात १३ कार्यकर्ते ठार झाले.
- या निदर्शनाचे नेतृत्व ममता बॅनर्जी करीत होत्या.
- त्यानंतर ममता बॅनर्जींनी आधी काँग्रेसमध्ये नंतर तृणमूल कॉंग्रेसद्वारे हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
- दरवर्षी २१ जुलै रोजी तृणमूल काँग्रेस तर्फे या दिवशी मोठ्या रॅलीचे आयोजन केले जाते.
- गेल्या वर्षी या दिवशी ममतांनी आपल्या कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
- याही वेळी शहीद दिवसाला ममता बॅनर्जी यांनी व्हर्च्युअली संबोधित केले.
- मात्र, यावेळी त्यांचे भाषण विविध शहरांमध्ये मोठ्या स्क्रीनवर स्थानिक भाषांमध्ये दाखविण्यात आले.
- दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा आणि इतर ठिकाणी ममतांच्या भाषणाचे स्थानिक भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवण्यात आले.
मिशन २०२४…दिल्लीत ममता सरकार!
- तृणमूल काँग्रेसने २१ जुलैच्या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.
- यासाठी त्रिपुरा, आसाम, ओडिसा, बिहार, पंजाब, उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्ये मोठ्या स्क्रिन बसविल्या होत्या.
- २०२४ मध्ये दिल्लीत ममता सरकार, या टॅगलाइनसह राष्ट्रीय राजकारणात सक्रियता वाढवली जाईल.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेश हा सर्वात मोठा घटक असणारच.
- त्यामुळे पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी दावा केला आहे की, उत्तरप्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभवासाठी सर्व प्रयत्न केले जातील.
बंगाल जिंकल्यानंतर इतर राज्यांकडे लक्ष
- तृणमूलचे सरचिटणीस बनल्यानंतर ममतांचे राजकीय वारसादर अभिषेक बॅनर्जी यांनी केवळ बंगालमध्येच नव्हे तर अन्य राज्यातही निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
- यापूर्वीही तृणमूलने केरळ आणि गुजरातमध्ये निवडणूक लढविली होती, परंतु फारसा परिणाम होऊ शकला नाही.
- ईशान्येकडील मणिपूर, अरुणाचल आणि त्रिपुरामध्ये पक्षाने जोर धरला पण तो टिकवता आला नाही.
- मात्र, आता देशाचा मूड बदलला असल्याने ममतांच्या नेतृत्वाला प्रतिसाद वाढेल असे तृणमूलच्या नेत्यांना वाटते.